नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : नवी गाडी खरेदी करण्याचा विचार करताय? फेस्टिव्ह सीजनमध्ये मिळणाऱ्या ऑफर्सची संधी गेली असेल, तरी आता फेस्टिव्ह सीजन सेलनंतरही तुम्ही नव्या कारच्या खरेदीवर चांगला डिस्काउंट मिळवू शकता. भारतीय स्टेट बँकेच्या योनो App कडून (YONO SBI) नव्या कार खरेदीवर चांगल्या ऑफर्स दिला जात आहेत. YONO SBI च्या माध्यमातून तुम्ही 50 हजार रुपयांपर्यतचा फायदा घेऊ शकता. ही ऑफर केवळ कार नाही, तर बाइक खरेदीवरही घेता येईल. YONO SBI द्वारे कार खरेदीवर केवळ पैशांचाच फायदा होणार नाही, तर कंपन्यांकडून दिले जाणारे बेनिफिट्सही मिळतील. काही ऑटो कंपन्या कार डिलीव्हरीमध्ये YONO SBI ग्राहकांना प्राथमिकता देत आहेत. म्हणजे तुम्ही YONO SBI माध्यमातून कार खरेदी केल्यास, तुम्हाला कार डिलीव्हरीसाठी अधिक काळ वाट पाहावी लागणार नाही. लगेच कारची डिलीव्हरी मिळेल.
Renault च्या या Cars वर बंपर सूट, मिळेल 1.30 लाखांपर्यतचा बेनिफिट
काय आहे ऑफर - जर तुम्ही SBI YONO App द्वारे महिंद्राची XUV किंवा Renault कार खरेदी केली, तर तुम्हाला कारसह मिळणाऱ्या एक्सेसरीज मोफत मिळतील. Renault कार खरेदीवर 5000 रुपयांपर्यंतच्या एक्सेसरीज मिळतील. Mahindra XUV च्या खरेदीवर 3000 रुपयांपर्यंतच्या एक्सेसरीज मिळतील. टोयोटादेखील अनेक कार खरेदीवर 5000 रुपयांपर्यंतच्या एक्सेसरीज ऑफर करत आहे. एक्सेसरीजशिवाय काही कंपन्या कॅश डिस्काउंटही देत आहेत. Datsun Go car खरेदी केल्यास 4000 रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काउंट मिळू शकतो. टाटा मोटर्स कार्सवर 5000 रुपयांपर्यतचा कॅश डिस्काउंट दिला जात आहे.
PHOTO: धुळ्यातील व्यक्तीच्या खिशातच फुटला OnePlus Nord 2, झाली भयंकर अवस्था
कारशिवाय जर तुम्हाला YONO App द्वारे टू-व्हिलर खरेदी करायची असल्यास, काही कंपन्या बाइक आणि स्कूटरवरही सूट देत आहेत. Hero स्कूटरवर 1500 रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो. Hero इलेक्ट्रिक ई-बाइक खरेदी केल्यास 2000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल.