मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /Renault च्या या Cars वर बंपर सूट, मिळेल 1.30 लाखांपर्यतचा बेनिफिट

Renault च्या या Cars वर बंपर सूट, मिळेल 1.30 लाखांपर्यतचा बेनिफिट

रेनोच्या वेगवेगळ्या मॉडेल्सवर ग्राहक 1.30 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट ऑफर मिळवू शकतात. कंपनीची ही ऑफर Renault Kwid, Renault Triber, Renault Kiger आणि Renault Duster सारख्या बेस्ट सेलिंग मॉडेल्सवर आहे.

नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : कार कंपनी Renault India नोव्हेंबरमध्ये आपल्या कार्सवर जबरदस्त ऑफर्स देत आहेत. रेनोच्या वेगवेगळ्या मॉडेल्सवर ग्राहक 1.30 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट ऑफर मिळवू शकतात. कंपनीची ही ऑफर Renault Kwid, Renault Triber, Renault Kiger आणि Renault Duster सारख्या बेस्ट सेलिंग मॉडेल्सवर आहे.

कंपनीच्या या डिस्काउंटमध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट बेनिफिट्स आणि लॉयल्टी बेनिफिट्स सामिल आहेत. रेनोच्या कार्सवर या ऑफर 30 नोव्हेंबरपर्यंत बुकिंग आणि खरेदीवर लागू आहेत.

Renault Triber -

या 7 सीटर MPV वर 60 हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे. या कारची सुरुवातीची किंमत 5.54 लाख रुपये आहे. यात 25 हजार रुपये कॅश डिस्काउंट आणि 25 हजारांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि 10 हजार रुपये कॉर्पोरेट बेनिफिट सामिल आहे.

Renault Kwid -

Renault Kwid वर 35 हजारांपर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो. यात 10 हजार रुपये कॅश डिस्काउंट, 15 हजारपर्यंत एक्सचेंज बेनिफिट्स आणि 10 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट मिळतो आहे. Renault Kwid कंपनीचं बेस्ट सेलिंग मॉडेल आहे. याची सुरुवातीची किंमत 4.06 लाख रुपयांपासून सुरू होते. Renault Kwid 0.8 लीटर आणि 1.0 लीटर इंजिनऑप्शनमध्ये येते.

Driving License हरवलं? घरबसल्या असं बनवा डुप्लीकेट; पाहा संपूर्ण प्रोसेस

Renault Kiger -

Sub-compact SUV Kiger वर एकूण 20 हजारांचा बेनिफिट असून या गाडीची सुरुवातीची किंमत 5.64 लाख रुपये आहे. यात 10 हजार रुपये स्पेशल लॉयल्टी बेनिफिट्स आणि 10 हजारांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट मिळतो आहे.

Car घ्यायची आहे पण बजेट कमी आहे? 3 लाखात येतील या 4 हॅचबॅक, पाहा काय आहे ऑफर

Renault Duster -

या गाडीवर सर्वाधिक 1.30 लाख रुपयांपर्यंत बेनिफिट मिळतो आहे. या कारची सुरुवातीची किंमत 9.86 लाख रुपये आहे. यात 50 हजारांपर्यंत एक्सचेंज बोनस, 50 हजार कॅश डिस्काउंट आणि 30 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट सामिल आहे.

First published:
top videos

    Tags: Car