• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • `या` 3 राशीच्या व्यक्तींपासून राहायला हवं सावध; स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याला देऊ शकतात दगा

`या` 3 राशीच्या व्यक्तींपासून राहायला हवं सावध; स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याला देऊ शकतात दगा

ज्योतिषशास्त्रानुसार 3 राशी (Zodiac Signs) अशा आहेत, की या राशींची माणसं खूप चलाख, हुशार असतात. आपल्या बोलण्यानं ते समोरच्या व्यक्तीला अगदी सहज प्रभावित करतात पण स्वतःच्या फायद्यासाठी फसवूही शकतात.

  • Share this:
नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर: प्रत्येक माणूस त्याच्या भविष्यकाळातल्या संभाव्य घटनांविषयी जाणून घेण्यास उत्सुक असतो. त्यासाठी बहुतांश जण ज्योतिष शास्त्राचा (Jyotish Shastra) आधार घेतात. 9 ग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्रांचा मानवी जीवनावर बरा-वाईट परिणाम होतो, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. त्यामुळे ग्रह-राशींच्या माध्यमातून जीवनातली सुख-दुःखं, यश-अपयश, वैवाहिक, सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक जीवनाविषयीच्या गोष्टींचा वेध घेतला जातो. प्रत्येक माणसाचा स्वभाव राशींवरून ठरतो, असंदेखील ज्योतिषशास्त्राचं म्हणणं आहे. वास्तविक कोणत्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, याविषयी अंदाज बांधणं तसं अशक्य असतं; मात्र काही व्यक्ती अत्यंत चलाख असतात. अशा व्यक्तींचं आकर्षक व्यक्तिमत्त्व, बोलणं किंवा वागण्याकडे तुम्ही सारासार विचार न करता आकर्षित झालात तर तुम्हाला प्रसंगी नुकसान सहन करावं लागू शकतं. ज्योतिषशास्त्रानुसार अशा 3 राशी (Zodiac Signs) आहेत, की या राशींची माणसं खूप चलाख, हुशार असतात. आपल्या बोलण्यानं ते समोरच्या व्यक्तीला अगदी सहज प्रभावित करतात आणि सहजतेनं फसवू शकतात. या राशींच्या व्यक्तींच्या स्वभाववैशिष्ट्यांची माहिती `आज तक`ने दिली आहे. दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक व्यक्ती भेटत असतात. आपणही अनेक व्यक्तींशी संवाद (Communication) साधत असतो. परंतु, काही व्यक्ती त्यांच्या वागण्या-बोलण्यानं किंवा आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळं अगदी सहज आणि कायमच्या लक्षात राहतात. खरं तर अशा व्यक्तींशी बोलताना किंवा व्यवहार करताना सावधगिरी बाळगणं आवश्यक असतं. त्यातही अशा व्यक्ती नात्यातल्या नसल्या, तर अधिक काळजी घ्यावी. अशा व्यक्तींची पारख करण्यासाठी, त्यांची स्वभाव वैशिष्ट्यं अधोरेखित करण्यासाठी ज्योतिषशास्त्र उपयुक्त ठरू शकतं. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन, कन्या आणि वृश्चिक या राशींच्या व्यक्तींवर विश्वास ठेवण्यापूर्वी अनेकदा विचार करावा, असं सांगितलं आहे. तुम्हालाही आपण छोट्या-छोट्या गोष्टी विसरतोय असं वाटतंय? हे घरगुती उपाय करून पहा मिथुन (Gemini) : या राशीच्या व्यक्तींना कलाकार समजलं जातं. या व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे हावभाव अचूकपणे टिपतात. या राशीच्या व्यक्ती कोणाचंही खोटं बोलणं अचूक पकडू शकतात. म्हणजेच या व्यक्ती सत्य सहजपणे ओळखतात. या व्यक्तींना कोणीही फसवू शकत नाही. या व्यक्ती खूप बोलणाऱ्या आणि खुल्या मनोवृत्तीच्या (Open Minded) असतात. परंतु, त्यांच्या मनात काय आहे, हे समोरच्या व्यक्तीला सहजासहजी माहिती होत नाही. कन्या (Virgo) : या राशीच्या व्यक्ती त्यांच्या आसपासच्या प्रत्येक गोष्टींकडे बारकाईनं लक्ष देतात. या व्यक्ती खूप हुशार आणि तीक्ष्ण बुद्धीच्या असतात. या व्यक्ती समोरच्या व्यक्तीशी अत्यंत गोड बोलून आपलं काम पूर्ण करून घेतात. कितीही कठीण प्रसंग आला तरी या व्यक्ती हार मानत नाहीत. प्रत्येक संकट आणि अडचणींचा सामना या राशीच्या व्यक्ती अत्यंत हुशारीनं करतात. Kartik Purnima 2021: कार्तिक पौर्णिमेला करा 'या' पाच गोष्टी; होईल मोठा धनलाभ वृश्चिक (Scorpio) : बुद्धिमत्तेविषयी बोलायचं झालं तर सर्वप्रथम वृश्चिक राशीचं नाव घेतलं जातं. या राशीच्या व्यक्ती एखाद्या गोष्टीच्या अत्यंत खोलात जाऊन तिला आपलं लक्ष्य बनवतात. या व्यक्तींना अंतर्ज्ञान चांगलं असतं. त्यामुळे एखाद्या गोष्टीतली कमतरता त्यांच्या चटकन लक्षात येते. या व्यक्तींचं बोलणं अत्यंत प्रभावी आणि आत्मविश्वासपूर्ण असतं. त्यामुळे समोरची व्यक्ती या व्यक्तींकडे पटकन प्रभावित होते. समोरच्या व्यक्तीला आपल्या बोलण्यात गुंतवून ठेवण्यात या व्यक्ती पटाईत असतात.
First published: