जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Kartik Purnima 2021: कार्तिक पौर्णिमेला 'या' पाच गोष्टींचा करा अवलंब; होईल मोठा धनलाभ

Kartik Purnima 2021: कार्तिक पौर्णिमेला 'या' पाच गोष्टींचा करा अवलंब; होईल मोठा धनलाभ

Kartik Purnima 2021: कार्तिक पौर्णिमेला 'या' पाच गोष्टींचा करा अवलंब; होईल मोठा धनलाभ

कार्तिक ( Kartik) महिन्याचा प्रारंभ हा दीपोत्सवातल्या महत्त्वाच्या सणांनी होतो. कार्तिक शुद्ध प्रतिपदा ही बलिप्रतिपदा म्हणून, तर द्वितीया ही तिथी यमद्वितीया म्हणजेच भाऊबीज म्हणून साजरी केली जाते. याशिवाय याच महिन्यात एकादशीला ( Ekadashi) चातुर्मासाची सांगता होते. कार्तिक महिन्यात प्रामुख्याने देवी लक्ष्मी आणि श्री विष्णू यांचं पूजन केलं जातं. या महिन्यात अन्य तिथींप्रमाणे पौर्णिमेलाही ( Kartik Purnima) विशेष महत्त्व आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

     मुंबई, 12 नोव्हेंबर-  कार्तिक ( Kartik) महिन्याचा प्रारंभ हा दीपोत्सवातल्या महत्त्वाच्या सणांनी होतो. कार्तिक शुद्ध प्रतिपदा ही बलिप्रतिपदा म्हणून, तर द्वितीया ही तिथी यमद्वितीया म्हणजेच भाऊबीज म्हणून साजरी केली जाते. याशिवाय याच महिन्यात एकादशीला ( Ekadashi) चातुर्मासाची सांगता होते. कार्तिक महिन्यात प्रामुख्याने देवी लक्ष्मी आणि श्री विष्णू यांचं पूजन केलं जातं. या महिन्यात अन्य तिथींप्रमाणे पौर्णिमेलाही ( Kartik Purnima) विशेष महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा ( Tripuri Purnima) असंही म्हटलं जातं. या दिवसाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवसांत दैवी लाभ मिळण्यासाठी शास्त्रामध्ये काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्या केल्याने धन, आरोग्य आणि मान-सन्मान यांमध्ये वृद्धी होते. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबतची माहिती दिली आहे. यंदा 19 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा आहे. या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हटलं जातं. याच दिवशी महादेव शिवशंकरांनी ( Lord Bholenath) त्रिपुरासुराचा ( Tripurasur) वध केला होता, असं मानलं जातं. म्हणूनच ही पौर्णिमा ‘त्रिपुरारी’ या नावानेही ओळखली जाते. कार्तिक पौर्णिमेचा उत्सव पाच दिवस चालतो. एकादशीपासून सुरू होऊन तो पौर्णिमेच्या दिवशी संपतो. या दिवसांत काय करणं श्रेयस्कर असतं, याविषयी पाहू या. एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत दररोज तुळशीला पाणी घालावं आणि तुळशीजवळची माती अंगारा म्हणून लावावी. शक्य असल्यास नेहमीच तुळशीला जल अर्पण करण्याची सवय लावावी. कारण असं केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि रोगांपासून मुक्ती मिळते, असं म्हटलं जातं. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळश वैकुंठधामामध्ये पोहोचली होती. त्यामुळे तिला जल अर्पण केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो, असं मानलं जातं. कार्तिकी एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत दररोज आंघोळ करताना पाण्यामध्ये गंगाजल आणि तीळ मिसळून स्नान करावं. असं केल्याने आर्थिक चणचण दूर होते आणि रखडलेली कामं पूर्ण होतात, असं मानलं जातं. हे पाच दिवस खूप शुभ मानले जातात. त्यामुळे या काळात असं करणं शुभ मानलं जातं तुमच्या घराजवळ, गावात नदी किंवा तलाव असेल तर एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत दररोज एक दिवा लावून तो नदी, तलावात सोडावा. नदी किंवा तलावात दिवा सोडणं शक्य नसेल, तर या काळात रोज दिवा तुळशीजवळ ठेवावा. दिवा प्रज्ज्वलित करून नदी-तलावात सोडल्याने अकाली मृत्यूचं भय राहत नाही, असा समज आहे. यासोबतच पितरांचा आशीर्वाद मिळतो. शनी, यम, राहू, केतू इत्यादींचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी दीपदान केलं जातं. (हे वाचा: Kartik Purnima 2021: कधी आहे कार्तिक पौर्णिमा? जाणून घ्या त्या … **)** कार्तिकी एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत दररोज विष्णुसहस्रनाम आणि लक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं आणि संध्याकाळी दीपदान करावं. असं केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात, मान-सन्मान मिळतो. तुम्हाला हे वाचणं शक्य नसेल तर ध्यान लावून ते नियमित ऐकावं. तुम्हाला देवी लक्ष्मीसोबत विष्णू नारायणाचा आशीर्वाददेखील मिळेल, असं म्हटलं जातं. कार्तिकी एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या 5 दिवसांत दररोज उगवत्या सूर्याला जल अर्पण करावं. त्या पाण्यात शेंदूर मिसळल्यास अधिक चांगलं. दररोज सूर्याला जल अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्त होतं आणि बुद्धिमत्ता, मान-सन्मानदेखील वाढतो. तसंच कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होते. सूर्य हा आत्मा, पिता, सरकारी नोकरी, उच्च पद इत्यादींचा कारक ग्रह आहे. कार्तिक पौर्णिमा हा तुळशीचा विवाह करण्याचा शेवटचा दिवस असतो. या दिवशी घरोघरी, अंगणात, मंदिरात दिवे लावण्याची पद्धत आहे. कार्तिकस्वामींचं दर्शन या दिवशी शुभ मानलं जातं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: lifestyle
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात