मुंबई, 11 नोव्हेंबर : अनेक वेळा वय जास्त नसतानाही काही जणांना अनेक गोष्टींचा, वस्तुंचा, केलेल्या कामाचाही विसर पडतो. हा प्रकार स्मरणशक्तीच्या कमतरतेमुळे असू शकतो. ज्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की पोषणाचा अभाव किंवा कोणतीही दुखापत किंवा आजार. यासाठी आपण आज स्मरणशक्ती वाढवण्याचे काही घरगुती उपाय पाहुयात, ज्याचा वापर करून तुम्ही या समस्येपासून स्वत:ला वाचवू (Boost Memory Power) शकता.
सफरचंद
Apple तुम्हाला स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करू शकते. यात क्वेर्सेटिन नावाचे अँटी-ऑक्सिडंट असते. हे मेंदूच्या पेशींना होणारे नुकसान टाळते. खरं तर, मेंदूच्या पेशींच्या नुकसानीमुळे, बौद्धिक क्षमतेत लक्षणीय घट होऊ शकते. ते योग्य ठेवण्यासाठी ऍपल चांगली भूमिका बजावते. तसेच पार्किन्सन्स आणि अल्झायमर सारख्या आजारांचा धोका कमी करण्यात मदत होते.
मासळी तेल सप्लिमेंट्स
फिश ऑइल सप्लिमेंट्स सुद्धा तुमची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खूप मदत करू शकतात. फिश ऑइलमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, इकोसापेंटायनोइक अॅसिड आणि डोकोसाहेक्साएनोइक अॅसिड भरपूर असते. ते चरबी, तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काम करतात.
ब्राह्मी
ब्राह्मी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि बौद्धिक क्षमता सुधारण्यासाठी देखील ओळखली जाते. हे स्मरणशक्ती राखण्याचे काम खूप सोपे करते. ब्राह्मीमध्ये अनेक बायोएक्टिव्ह पदार्थ असतात जसे की बेकोसाइड आणि सिटागमास्टरॉल, जे मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करतात.
जिनसेंग
स्मरणशक्ती आणि बौद्धिक क्षमता वाढवणारी औषधी वनस्पती म्हणूनही जिनसेंग ओळखले जाते. त्यात जिन्सेनोसाइड नावाचा सक्रिय घटक असतो जो नूट्रोपिक प्रभाव वाढवण्याचे काम करतो. हे मेंदूच्या पेशींमध्ये सिग्नल पाठविण्यास मदत करते. त्यामुळे गोष्टी लक्षात ठेवण्यास मदत होते.
शंखपुष्पी
शंखपुष्पी औषधी वनस्पतीमध्ये अनेक अँटिऑक्सिडेंट संयुगे असतात. यामुळे स्मरणशक्ती कमी होण्याची समस्या कमी होते. हे तणाव, निद्रानाश आणि चिंता उपचारांमध्ये वापरले जाते. हे मेंदूच्या पेशींमधील कनेक्शन वाढवते, ज्यामुळे मेंदूचे कार्य सुधारते.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती विविध स्त्रोतातून मिळवलेल्या सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Mental health