प्राण्यांचा व्हिडीओ
मुंबई, 24 जून : सोशल मीडियावर प्राण्यांचे नेहमीच काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंमध्ये प्राण्यांची मारामारी, प्राण्यांची शिकार आणि इतर प्राण्यांना मदत करतानाचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. कधीकधी प्राणी अशा काही गोष्टी करतात ज्याचा आपण विचार देखील करु शकत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यामध्ये एक प्राणी दुसऱ्या प्राण्यांची मदत करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी कौतुक करत आहेत. तो रागावलेल्या बैलासमोर झोपला, बैल धावत आला आणि… Video पाहण्याची हिंमत असेल तरच पाहा जिथे माणसाकडे सगळ्या गोष्टी असून देखील तो कधी कधी कोणाची मदत करताना मागे पुढे पाहातो. परंतू इथे हत्तीने हरणाची मदत करताना कशाचाही विचार केला नाही. खरंतर एक हरणाचं पिल्लू पाण्यात अडकलं होतं. हा पाण्यातील मोठा खड्डा होता जिथे तो हरीण अडकला आणि त्याला बाहेर येता येत नव्हते. तेव्हा तिथे पाणी प्यायला आलेल्या हत्तीने हरणाची मदत केली. Video Viral : घराच्या छताला लटकत होता मुलगा, खतरनाक वाघानं उडी घेतली आणि… व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, पाण्याने भरलेल्या खड्ड्यात एक हरण पडले आहे आणि ते बाहेर पडण्यासाठी खूप अस्वस्थ होत आहे. त्याच्या आजूबाजूला हत्तींचा कळप आहे. हरिण वारंवार खड्ड्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे, पण तो बाहेर पडू शकत नाही. तेवढ्यात हरणाच्या मागे उभा असलेला हत्तीने हरणाला मागून लाथ मारली, ज्यामुळे हरिण खड्यातून बाहेर येऊ शकला.
या प्रकरणात हत्तीने स्वत:बद्दल काहीही विचार न करता फक्त हरणाची मदत करण्याचा प्रयत्न केला. जे अनेकांच्या मनात घर करुन गेलं. हा व्हिडीओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे - जर ते दयाळू असू शकतात, तर आपण का होऊ शकत नाही? 13 सेकंदांचा हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स देखील केल्या आहेत.