जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Video Viral : घराच्या छताला लटकत होता मुलगा, खतरनाक वाघानं उडी घेतली आणि...

Video Viral : घराच्या छताला लटकत होता मुलगा, खतरनाक वाघानं उडी घेतली आणि...

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

छताला लटकलेले मूल आणि खाली उभा असलेला वाघ यांच्यात फक्त 2 फुटाचे अंतर आहे. हा व्हिडीओ खरोखर हृदयाचे ठोके चुकवणारे असतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 20 जून : प्राण्यांशी संबंधीत व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे पाहून लोक आश्चर्यचकित होतात. यातील काही व्हिडीओ असेही आहेत, जे पाहून तुमचा थरकाप उडेल. असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, ज्यामध्ये एक लहान मूल घराच्या छताला लटकत आहे आणि त्याच्या खाली एक वाघ उभा आहे. या व्हिडीओ पाहून नक्कीच तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल आणि पुढे काय घडेल या विचारात तुम्ही रहाल. वाघ आणि मुलगा या दोघांमध्ये फक्त 2 फुटाचे अंतर आहे. त्यानंतर काय झाले याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. Video Viral : जग्वारचा मगरीवर हल्ला; दोन्ही धोकादायक शिकाऱ्यांमध्ये कोण जिंकेल? व्हिडीओमध्ये एक लहान मूल घराच्या छताला लटकत असल्याचे दिसत आहे. तेव्हाच एक वाघ चालत तिथे पोहोचतो. वाघ हळू हळू मुलाकडे सरकतो. छताला लटकलेले मूल आणि खाली उभा असलेला वाघ यांच्यात फक्त 2 फुटाचे अंतर आहे. वाघ मुलाला जबड्यात पकडेल असे वाटते पण तसे होत नाही. छताला लटकलेले मूल आणि खाली उभा असलेला वाघ यांच्यात फक्त 2 फुटाचे अंतर आहे. वाघाला न घाबरता ते मूल पटकन पाय वर करून घराच्या छतावर पोहोचते आणि वाघाला पाहून ते मुल हसू लागतं. त्याच वेळी, अपयशी असूनही, वाघ देखील मौजमजेत शेपूट हलवत उडी मारतो. नशीबाने हे वाघाचं बछड आहे, जर या जागी खरा वाघ असता तर तो नक्कीच या मुलापर्यंत पोहोचू शकला असला. वासराला वाघ पकडणार इतक्यात गायीची एन्ट्री, 10 सेकंदात पलटला संपूर्ण गेम, पाहा Video इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ एम.आर. सलमान खान नावाच्या युजरने शेअर केले आहे. आतापर्यंत या व्हिडीओला शेकडो व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. अनेकांनी या मुलाच्या घरच्यांना यासाठी दोषी ठरवलं आहे. आपल्या मुलाची काळजी न घेतल्यामुळे काही लोक त्याच्या आईला दोष देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात