मुंबई, 18 जून : बुल फाईटचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. ज्यामध्ये दोन शक्तीशाली बैलांमध्ये भांडणं लावून दिले जातात. तर कधी एक व्यक्ती बैलांमध्ये उभा राहून बैलांना आणि त्यांच्या रागांना हँडल करत असतो. तुम्ही सिनेमात देखील पाहिलं असेल की एक व्यक्ती लाल रंगाचा कपडा घेऊन उभी असते आणि ती बैलाला अटॅक करण्यासाठी उकसवत असते. तसे पाहाता बूल फाईट हा खूप धोकादायक खेळ आहे, कारण यामुळे एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो, असा अनेक घटना देखील समोर आल्या आहेत. परंतू हे अनेक लोकांसाठी मनोरंजनाचं साधन देखील आहे. अनेक भागात हे खेळ भरवण्यावर बंदी घातली गेली आहे. परंतू अजूनही असे देश आहेत जिथे हा खेळ चालतो. Viral : बैलापासून स्वत:ला वाचवण्यासाठी खांबावर चढली व्यक्ती आणि… धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद अशाच एका खेळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तुमच्या काळजाचा ठोका नक्कीच चुकवेल. कारण हा खेळ एका व्यक्तीच्या जीवावर बेतला आहे. नशीबाने ही व्यक्ती जिवंत आहे. परंतू बैलाच्या हल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. या व्हिडीओमधील व्यक्तीसोबत इतकी भयानक घटना घडते की कदाचित तुम्ही ते पाहू देखील शकणार नाही. दोन बैलांची लागली झुंज, वृद्ध महिला मध्येच सापडली, LIVE VIDEO व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये बैलाच्या झुंज दरम्यान एक व्यक्ती बैलासमोर लाल कपडा धरुन उभी आहेत, तर काही वेडे लोक संतप्त बैलाच्या पाठीवर बसून त्यावर स्वार होताना दिसतात. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती बैलासमोर उभी असते, तेव्हा तो बैल धावत येतो आणि या व्यक्तीला आडवं पाडतो.
इतकच नाही तर, या बैलाशी शिंग व्यक्तीच्या हातात घुसतात, ज्यामुळे त्याच्या दंडाचा काही भाग रक्तबंबाळ होतो. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बैल आपल्या शिंगांच्या सहाय्याने त्या व्यक्तीला लांबपर्यंत खेचतोय. त्यानंतर तो तिला सोडून जातो. ती व्यक्ती वेगाने उठून हात वर करून बाहेर पळताना दिसत आहे. जे पाहून युजर्सचे मन हेलावले आहे.