JOIN US
मराठी बातम्या / Viral / नवरा-बायकोचं भांडण आणि काही क्षणात दोघांचाही 'खेळ खल्लास'; असा शेवट झाला की... पाहा VIDEO

नवरा-बायकोचं भांडण आणि काही क्षणात दोघांचाही 'खेळ खल्लास'; असा शेवट झाला की... पाहा VIDEO

कपलच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जाहिरात

पती-पत्नीच्या भांडणाचा धक्कादायक शेवट.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मॉस्को, 22 फेब्रुवारी : नवरा-बायकोतील भांडणं तशी काही नवी नाहीत. बहुतेक पती-पत्नीत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होतातच. अशाच एका कपलच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कारण या कपलच्या भांडणाचा शेवट धक्कादायक झाला आहे. भांडता भांडता हे कपल अशा ठिकाणी पोहोचलं की काही क्षणात त्यांच्या भांडणाचा खेळ खल्लास झाला. रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमधील ही घटना आहे. ओल्गा वोल्कोवा आणि एवगेनी कार्लागिन हे दाम्पत्य पीटर्सबर्गमध्ये रस्त्याशेजारी असलेल्या एका बिल्डिंगमध्ये राहतं. बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर त्यांचं घर आहे. काही कारणावरून त्यांच्यात भांडणं झाली. त्यांच्या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. एकमेकांना मारत मारत ते घराच्या बाल्कनीत आले आणि त्यानंतर त्यांच्यासोबत धक्कादायक घडलं. हे वाचा -  कोरोनाच्या भीतीने महिलेने मुलासह स्वतःला 3 वर्षे घरात कोंडलं, नवऱ्यालाही घेतलं नाही; आता दरवाजा उघडताच… रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता ब्लाकनीत एक कपल दिसतं आहे. दोघही एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. एकमेकांना मारहाण करत आहेत. एकमेकांना मारहाण करत असताना दोघंही बाल्कनीला धडकले, त्याच क्षणी बाल्कनीची रेलिंग तुटली आणि दोघंही बाल्कनीतून थेट खाली कोसळले. 25 फूट खाली असलेल्या फूटपाथवर ते पडले. महिला क्राँक्रीटच्या ढिगाऱ्यावर कोसळली तर तिचा नवरा जमिनीवर कोसळला. हे वाचा -  धक्कादायक! रस्त्यावरील भटक्या Puppy ला नवऱ्याने घरी आणलं, बायकोचा मृत्यू; असं काय घडलं? मेट्रो यूकेच्या रिपोर्टनुसार प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, गेल्या शनिवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास कपल बाल्कनीत भांडत होतं. काही वेळात दोघंही बाल्कनीतून पडले. आम्ही तात्काळ अॅम्ब्युलन्स बोलावून घेतली आणि त्यांना रुग्णालयात नेलं. सध्या दोघंही धोक्याच्या बाहेर आहेत. पण या दुर्घटनेत दोघांचे हातपाय फ्रॅक्चर झाले आहेत.

संबंधित बातम्या

दरम्यान पीटर्सबर्ग प्रशासन या प्रकरणाचा तपास करत आहे. बिल्डिंगच्या बाल्कनीमध्ये काही त्रुटी होत्या का हे पाहिलं जाणार आहे. जर बिल्डिंग कमजोर निघाली तर या प्रकरणी केस होईल. कारण ही बिल्डिंग ऐतिहासिक ठिकाणी आहे, 1833 पासून ती असल्याचं सांगितलं जातं आहे..

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या