मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कोरोनाच्या भीतीने महिलेने मुलासह स्वतःला 3 वर्षे घरात कोंडलं, नवऱ्यालाही घेतलं नाही; आता दरवाजा उघडताच...

कोरोनाच्या भीतीने महिलेने मुलासह स्वतःला 3 वर्षे घरात कोंडलं, नवऱ्यालाही घेतलं नाही; आता दरवाजा उघडताच...

कोरोनामुळे महिला मुलासह 3 वर्षे घरात बंदिस्त. (प्रतीकात्मक फोटो/ सौजन्य-Canva)

कोरोनामुळे महिला मुलासह 3 वर्षे घरात बंदिस्त. (प्रतीकात्मक फोटो/ सौजन्य-Canva)

कोरोनाच्या भीतीने 2020 साली स्वतःसह मुलाला घरात कोंडून घेतलेली महिला लॉकडाऊन शिथील झाल्यानंतरही घराबाहेर पडली नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Haryana, India

चंदीगढ, 22 फेब्रुवारी : कोरोना कालावधीत लॉकडाऊन लागू करण्यात आला. कारणाशिवाय लोकांना घराबाहेर पडण्यासही मनाई होती. बरीच बंधनं होती. लोकंही कोरोनाच्या भीतीने घऱाबाहेर पडत नव्हते. पण काही कालावधीने जसं कोरोनाचा धोका कमी झाला, लॉकडाऊन संपला तसा लोकांनी घराबाहेर पडत मोकळा श्वास घेतला. पण एका महिलेने मात्र कोरोनाचा इतका धसका घेतला की तिने स्वतःसह आपल्या मुलालाही तब्बल तीन वर्षे घरात कोंडून घेतलं. तिने आपल्या नवऱ्यालाही घरात घेतलं नाही.

हरयाणाच्या गुरूग्राममधील ही धक्कादायक घटना आहे. मारूती कुंजमध्ये राहणारी मुनमुन माझीने कोरोनापासून वाचण्यासाठी 2020 साली आपल्या 10 वर्षांच्या मुलासह स्वतःला घरात कैद करून घेतलं. तिला कोरोनाची इतकी भीती होती की तिने घराबाहेर गेलेल्या आपल्या नवऱ्यालाही पुन्हा घरात प्रवेश करू दिला नाही. सुजान असं तिच्या नवऱ्याचं नाव. तो एक इंजिनीअर आहे. 2020 साली पहिल्या कोरोना लॉकडाऊननंतर थोडे नियम शिथील करण्यात आले होते, तेव्हा तो काही कामानिमित्त घराबाहेर पडला.  त्यानंतर मुनमुनने त्याला घरात येण्यास मनाई केली.

हे वाचा - घशात खवखव, पायात तीव्र वेदना आणि तरुणाचा गेला जीव; डॉक्टरांनाही मृत्यूनंतर समजलं धक्कादायक कारण

तिच्या नवऱ्याने घऱाबाहेर राहून आपलं कर्तव्य निभावलं आणि कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण केले. त्याने त्याच परिसरात भाड्याने घर घेतलं. व्हिडीओ कॉलमार्फत तो त्यांच्या संपर्कात होता. त्यांच्यासाठी किराणा सामान, भाज्याफळंही खरेदी करून दरवाजावर आणून ठेवायचा.  मुलाच्या शाळेची फी भरली.

सूजान तिला वारंवार बाहेर यायला सांगत होता पण तरी मुनमून आली नाही. सिलेंडर संपल्यानंतर तिने गॅस वापरणं बंद केलं. त्याऐवजी ती जेवण बनवण्यासाठी इंडक्शन हिटर वापरू लागली. पण तरी असं जीवन कधीपर्यंत जगणार. सूजानने तिला खूप समजावलं पण ती त्याचं काहीच ऐकत नव्हती. त्याने तिच्या माहेरच्यांनाही तिला समजावयाला सांगितलं. पण मुनमुन आपल्या निर्णयावर ठाम होती. ती घराबाहेर यायला तयारच नव्हती. जोपर्यंत आपल्याजवळ मुलांसाठी कोरोना लस येत नाही तोपर्यंत आपण असंच राहणार असं तिने सांगितलं.

अखेर सूजानजवळ पोलिसांची मदत घेण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार चक्करपूर पोलीस ठाण्यातील सब इन्स्पेक्टर प्रवीण कुमार म्हणाले, हे कौटुंबिक प्रकरण होतं, त्यामुळे सुरुवातीला मी गांभीर्याने घेतलं नाही. पण ती व्यक्ती संकटात होती. तिने तेव्हा मला व्हिडीओ कॉलवर त्याची पत्नी आणि मुलासोबत बोलणं करून दिलं. तेव्हा मुलाशी बोलल्यानंतर मी थोडा अस्वस्थ झालो. तीन वर्षे आपण उन्हात बाहेर पडलो नाही, असं तो म्हणाला.

हे वाचा - पायाची किरकोळ दुखापत 11 वर्षीय मुलाच्या जीवावर बेतली; मृत्यूचं कारण धक्कादायक

अखेर मंगळवारी पोलीस आणि आरोग्य-बाल कल्याण विकास अधिकाऱ्यांच्या टीमने दोघांनाही दरवाजा तोडून बंद घरातून बाहेर काढलं. दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या माहितीनुसार महिलेला कोरोना काळात महिलेला अँझायटी झाली असावी ज्यामुळे तिच्या वागणुकीत असा बदल झाला.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Haryana, Health, Lifestyle