JOIN US
मराठी बातम्या / Viral / शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या वडिलांना अफगाण मुलीने दिलं 'हे' उत्तर; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या वडिलांना अफगाण मुलीने दिलं 'हे' उत्तर; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

अफगाणिस्तानमधल्या महिला आणि मुलींची स्थिती दर्शविणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जाहिरात

अफगाणिस्तानी मुलीचा व्हिडीओ (फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

काबुल, 14 जुलै : आज महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मुलीदेखील उच्च शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात यश संपादन करत आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिला कुठेही कमी नाहीत असं चित्र सर्वच क्षेत्रांत आहे; मात्र अफगाणिस्तानमध्ये याउलट चित्र आहे. हा देश तालिबानच्या ताब्यात गेल्यापासून तिथल्या महिला, मुलींवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. मुली, महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे. अफगाणिस्तानमधल्या महिला आणि मुलींची स्थिती दर्शविणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या देशातल्या महिला, मुलींची विदारक स्थिती वडील-मुलीच्या संवादातून स्पष्ट होत आहे. तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतली, तेव्हापासून मुलींना शाळेत जाण्यावर निर्बंध घालण्यासह अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. अशा परिस्थितीतही अफगाणी मुली शाळेत जाण्याचं स्वप्न पाहत आहेत. या देशातल्या एका छोटी मुलीचा तिच्या वडिलांशी सुरू असलेल्या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘शाळा फक्त मुलांसाठी आहे,’ असं तिचे वडील तिला मजेने म्हणताना या व्हिडिओत दिसतात. 10 सेकंद प्रायव्हेट पार्टला स्पर्श, सोशल मीडियावर VIDEO VIRAL; असं का करत आहेत लोक? `द अफगाण` या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. गुरुवारी (13 जुलै) शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ आत्तापर्यंत 2.47 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. त्यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, की `या प्रेरणादायी व्हिडिओत एक अफगाण वडील आपल्या मुलीला गमतीने सांगतात की शाळा ही फक्त मुलांसाठी आहे; पण ती मुलगी अत्यंत हुशारीने उत्तर देत म्हणते, की शिक्षण सर्वांसाठी आहे. दुर्दैवाने, गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळापासून अफगाण मुलींना शाळा आणि विद्यापीठांपासून दूर केलं गेलं आहे. शिक्षण हा मूलभूत मानवी हक्क आहे आणि अफगाण मुलींना शिकण्याचा अधिकार नाकारणं हे केवळ त्यांच्या वैयक्तिक विकासालाच नव्हे तर संपूर्ण देशाच्या प्रगतीला बाधक आहे. या मुलीचं धैर्य अगणित अफगाण मुलींच्या सामूहिक आवाजाचं प्रतिनिधित्व करतं, ज्यांना समान शैक्षणिक संधी मिळण्याची इच्छा आहे.` या व्हिडिओत, `तू निराश का आहेस`, असा प्रश्न एक अफगाण वडील त्यांच्या मुलीला विचारताना दिसत आहेत. त्यावर ती मुलगी `तुम्ही मला शाळेत जाऊ देत नाही`, असं उत्तर देते. त्या वेळी ती व्यक्ती म्हणते, `मी केवळ तुझ्या भावाला शाळेत घालणार आहे. कारण केवळ मुलांनाच शाळेत प्रवेश आहे, मुलींना नाही.` त्यावर ती छोटी मुलगी म्हणते, `मुलीसुद्धा शाळेत जातील. संघर्ष आणि विनाश या दोन्ही गोष्टी माणसानं तयार केल्या आहेत.` यावर वडिलांनी मुलीला विचारलं कोणत्या गोष्टी पुरुषांनी उद्ध्वस्त केल्या आहेत. त्यावर मुलगी म्हणते, `काबूलपासून कंदहारपर्यंत किती ठिकाणं उद्ध्वस्त झाली आहेत ते तुम्ही स्वतःच जाऊन पाहा.` आयुष्यभराची पुंजी खर्चून घेतलं ‘ड्रिम हाऊस’; राहायला जाताच बसला मोठा धक्का मुलगी पुढे म्हणते, `महिला केवळ घरातच राहतात आणि त्यांनी काही उद्ध्वस्त केलेले नाही. सामान्यपणे मुली शाळेत जातात. महिला नाही. खरं तर महिलादेखील शाळेत जाऊ शकतात.` त्यानंतर वडिलांनी विचारलं, की `तू शाळेत जाऊन काय करणार. त्यावर मुलीने उत्तर दिलं, की ‘डॉक्टर, इंजिनीअर किंवा शिक्षक बनणार. आपल्याला आपल्या देशाची पुनर्बांधणी करायची आहे.` यावर वडील म्हणाले, `आपण देशाची पुनर्बांधणी करू.` यावर मुलगी म्हणाली, `नाही. तुम्ही घरी बसा. आम्ही देशाची पुनर्बांधणी करू.` सोशल मीडियावरचा हा व्हायरल व्हिडिओ लोकांना विचार करायला लावत आहे. या वडील-मुलीचा संवाद लोकांना आवडला असून त्यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. यात एक युझर लिहितो, `ही लहान मुलगी म्हणाली, की महिलांना या देशाची पुनर्बांधणी करू द्या, ते सर्वांत सुंदर आहे. एका धाडसी, हुशार आणि जिद्दी मुलीचे संगोपन करणाऱ्या वडिलांचे अभिनंदन. तिच्या व्यक्तिमत्त्वातला धाडसी गुण बाहेर काढण्यासाठी ते हे सर्व सांगत आहेत.` `घरी बसलेल्या आणि शिक्षणाचा मूलभूत हक्क नाकारलेल्या लहान मुलीच्या डोळ्यातल्या अनेक स्वप्नांचा चुराडा होताना पाहून माझं मन तुटतं,` असं आणखी एका युझरने कमेंटमध्ये म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या