जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आयुष्यभराची पुंजी खर्चून घेतलं 'ड्रिम हाऊस'; राहायला जाताच बसला मोठा धक्का

आयुष्यभराची पुंजी खर्चून घेतलं 'ड्रिम हाऊस'; राहायला जाताच बसला मोठा धक्का

प्रतीकात्मक फोटो - Canva

प्रतीकात्मक फोटो - Canva

जेव्हा लोक इथं राहायला आले तेव्हा हे ड्रिम हाऊस त्यांना एका भयानक स्वप्नासारखं वाटलं.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

लंडन, 14 जुलै :  प्रत्येकाचं स्वप्नातलं एक घर असतं. काही लोक हे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी पै पै जमवतात. असे काही लोक ज्यांनी आयुष्यभराची पुंजी खर्चून ड्रीम हाऊस घेतलं. पण प्रत्यक्षात तिथं राहायला जाताच ल पायाखालची जमीनच सरकली. इतकी वर्षे बचत केलेले सर्व पैसे खर्च करून घेतलेल्या घराबाबत धक्कादायक वास्तव समोर आलं. यूकेतील हे प्रकरण आहे. इथं पॉश सोसायटीच्या विकासाचा प्रकल्प सुरू झाला सुंदर लोकेशन आणि घर पाहून लोकांनी त्यात गुंतवणूक केली.  त्यांना घरही मिळालं. पण इथं शिफ्ट झाल्यावर त्यांना असं काही दिसलं की ते घर सोडण्यासाठी धडपड करू लागले. इथं शिफ्ट होईपर्यंत सर्वकाही ठिक वाटत होतं. पण जसे ते इथं राहायला आले तेव्हा हे ड्रिम हाऊस त्यांना एका भयानक स्वप्नासारखं वाटलं. 40 ते 60 लाखांची गुंतवणूक करून येथे घर घेतलं होतं, पण घरांच्या नावावर आपली फसवणूक झाल्याचं ते सांगतात. नवऱ्याने बायकोसाठी चेक केला घरचा सीसीटीव्ही; समोर जे दिसलं ते हादरवणारं मिररच्या रिपोर्टनुसार,  इथं आल्यावर त्यांना कळलं की त्यांची मुलं ना घराबाहेर खेळायला जाऊ शकत, ना ते स्वतः बाहेर फिरायला जाऊ शकत. रस्त्यावर बहुतांश ठिकाणी खड्डे, नाले, ट्रॅफिक स्पॉट आहेत. ते इतके अरुंद झाले आहेत की चालणंही कठीण झालं आहे. जे आधीपासून इथे राहत आहेत त्यांनाही लवकरात लवकर जागा सोडायची आहे. पण ज्यांनी इथं रिटायरमेंट होम म्हणून घरं घेतली आहेत, त्यांच्यासाठी हे आणखी कठीण आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात