नवी दिल्ली, 14 जुलै : तुम्ही सोशल मीडियावर विशेषतः इन्स्टाग्राम पाहिलं असेल तर तुम्हाला काही विचित्र व्हिडीओ व्हायरल होत असलेले दिसतील. ज्यात काही लोक आपल्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करत आहेत. अगदी वेळ लावून असं केलं जात आहे. 10 सेकंद प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला जातो आहे. फक्त महिलाच नव्हे तर पुरुषही यात दिसत आहेत. तसं हा पाहायला विचित्र वाटतं पण यामागील स्टोरी मोठी आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रायव्हेट पार्ट टचच्या या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लोक असं का करत आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. #10secodi या हॅशटॅगने हे व्हिडीओ पोस्ट केले जात आहेत. काही व्हिडीओमध्ये लोक स्वतःच्याच प्रायव्हेट पार्टला स्पर्श करत आहेत. महिलांसह पुरुषही असं करताना दिसत आहेत. तर काही व्हिडीओमध्ये इतर व्यक्ती दुसऱ्याच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करत आहे. लोक असं करत आहेत, यामागे एक कारण आहे. फॅशन डिझाइनर नव्हे तर कार इंजिनीअरने बनवली होती; BIKINI बाबत 8 आश्चर्यकारक गोष्टी खरं तर हे असे व्हिडीओ कोर्टाच्या एका निर्णयाविरोधात आहे. एका इटालियन न्यायाधीसाने लैंगिक अत्याचाराच्या आरोपीला निर्दोष मुक्त केलं. ‘10 सेकंदांपेक्षा कमी स्पर्श करणे लैंगिक छळ नाही’, असं न्यायाधीशानं म्हटलं. लैंगिक अत्याचाराच्या आरोपीबाबत असा निर्णय देत कोर्टाने त्याला निर्दोष मुक्त केलं. याला लोकांनी विरोध केला आहे. निर्णयाचा निषेध म्हणून असे व्हिडीओ बनवून ते सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत.
महिला, पुरुष 10 सेकंदांसाठी प्रायव्हेट पार्टवर हात ठेवून हा निर्णय किती चुकीचा आहे हे दाखवत आहेत.