गायीचा व्हायरल व्हिडीओ
मुंबई, 27 जून : अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात लोक विनाकारण प्राण्यांवर अत्याचार करतात. लहान-लहान गोष्टींसाठीही कधी कधी प्राण्यांचा छळ करून त्यांना मारले जाते. त्यांच्याकडून जबरदस्ती काम करवलं जातं, तर कधी प्राण्यांना उपाशी देखील ठेवलं जातं. काही दिवसांपूर्वी तर केदारनाथमधील घोड्याला जबरदस्ती विड प्यायला दिल्याचा देखील व्हिडीओ समोर आला आहे. परंतू असलं असलं तरी सध्या असा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये माणूसकी अजूनही जिवंत असल्याचे तुम्ही पाहू शकता. तसे पाहता इथे माणसांना माणसांची काळजी घ्यायला वेळ नाही, मग अशात प्राण्यांची काळजी कोणाला आहे? त्यांचा विचार फारच कमी लोक करताना दिसतात. परंतु सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एका दयाळू माणसानं गायीला वाचवलं आहे. किंग कोब्राच्या पोटात दिसली धक्कादायक गोष्ट, एक्सरे पाहून डॉक्टरही आश्चर्यचकीत व्हिडीओमध्ये एक भयानक पूर आलेला दिसत आहे, ज्यामध्ये एक गाय वाहत असल्याचे दिसत आहे. अचानक आलेल्या पुराच्या तीव्रतेमुळे गायीला स्वतःहून पोहत किनाऱ्यापर्यंत पोहोचता येत नव्हते, या व्हिडीओत तुम्ही हे स्पष्ट पाहू शकता की एक गाय बाहेर येण्यासाठी धडपड करत आहे. दरम्यान, कालव्याच्या मध्यभागी एका जेसीबीची बादली लटकलेली दिसत आहे. गाय या जेसीबीजवळ येताच चालकाने लगेच गायीला सुखरूप बाहेर काढले. गायीला कोणतीही इजा न करता काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आले. Video Viral : चोरांची इमानदारी ज्यांना लूटायचं होतं, त्यांनाच देऊन गेले शंभराची नोट जेसीबी ऑपरेटरने गायीला इजा न करता काळजीपूर्वक बाहेर काढले आणि जमिनीवर सोडले. गाय लगेच उभी राहण्यासाठी धडपडते. जेसीबीच्या जवळ इतर अनेक लोक देखील दिसतात जे सतत जेसीबी ऑपरेटरला सूचना देत असतात.
खरंतर लोकांच्या टीमवर्कमुळे गायीला नवसंजीवनी मिळाली. ज्यामुळे तिला पाण्याबाहेर काढण्यात मदत मिळाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर @WallStreetSilv नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी या जेसीबी चालकाचे कौतुक केले आहे. या व्हिडीओला अत्तापर्यंत हजारो लाईक्स आले आहेत.