उर्फी जावेदचं मेल व्हर्जन
दिल्ली, 01 एप्रिल : अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच आपल्या अतरंगी फॅशनसाठी चर्चेत असते. तिच्या या फॅशनवरून बरेच वादही झाले आहेत. उर्फी कमी की काय त्यात आता उर्फीचा मेल व्हर्जनही समोर आला आहे. उर्फीसारखाच अतरंगी फॅशन करणारा एक तरुण. ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या तरुणाने तर विचित्र फॅशनच्या बाबतीत आता उर्फीलाही मागे टाकलं आहे. त्याने चक्क झणझणीत मिरच्यांच ड्रेस घातला आहे. उर्फी जावेदच्या फॅशनला फॉलो करणारा हा तरुण. ज्याने उर्फीसारखी फॅशन करण्याच्या नादात आता हद्दच पार केली आहे. नको तेच तो करून बसला आहे. त्याने चक्क झणझणीत लाल मिरच्यांचा ड्रेस बनवला आणि तो घातला आहे. आता मिरची हाताला लागली तरी किती झोंबते, हे तुम्हाला माहितीच आहे. अशी मिरची या तरुणाने आपल्या संपूर्ण अंगाला गुंडाळली आहे. त्यानंतर त्याचं काय झालं ते तुम्हीच व्हिडीओत पाहा.
व्हिडीओत पाहू शकता तरुणाच्या शरीरावर मिरच्याच दिसत आहेत. त्याने मिरच्यांपासून ड्रेस तयार केला आहे. छाती आणि पोटाच्या खाली या मिरच्या अशा लावल्या आहेत, जणू तो एक ड्रेसच वाटतो आहे. फक्त ड्रेसच नव्हे तर त्याने मिरच्यांचे दागिनेही घातले आहेत. म्हणजे त्याच्या कानात मिरच्यांचे इअरिंग, गळ्यात मिरच्यांचा नेकलेस, दोन्ही हातांना मिरच्यांचे बाजूबंद आणि डोक्यावर केसाच्या भांगेत मिरच्यांची बिंदीही दिसते आहे. April Fool 2023 : एप्रिलच्या 1 तारखेलाच का बनवलं जातं मूर्ख? रंजक आहे एप्रिल फूलचा किस्सा त्याच्या शरीरावर मिरच्या पाहून आपल्या शरीराची आगआग होते. पण हा तरुण मात्र त्याच मिरच्यांच्या शरीरासह तो पोझ देतो आणि डान्स करतानाही दिसतो. हातात मिरच्या घेऊन फुलांच्या पाकळ्या उडवाव्यात तशा त्या मिरच्या उडवतो. त्यानंतर अगदी नजाकतमध्ये तो डान्स मुव्हमेंट करतो. तरुणाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याने उर्फीला झणझणीत टक्कर दिला आहे असंच म्हणावं लागेल. कदाचित त्याचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर उर्फीला ठसका बसेल. आश्चर्य! याच्या पोटावर चेहरा; गाईच्या अजब वासराला पाहण्यासाठी लोकांच्या रांगा; पाहा PHOTO इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. कुणी याला उर्फीचा भाऊ मिरची जावेग म्हटलं आहे. तर काही युझर्सनी भाऊ आग झाली का? असंही विचारलं आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.