मराठी बातम्या /बातम्या /Viral /April Fool 2023 : एप्रिलच्या 1 तारखेलाच का बनवलं जातं मूर्ख? रंजक आहे एप्रिल फूलचा किस्सा

April Fool 2023 : एप्रिलच्या 1 तारखेलाच का बनवलं जातं मूर्ख? रंजक आहे एप्रिल फूलचा किस्सा

एप्रिल फूल 2023

एप्रिल फूल 2023

एप्रिल फूल कधी आणि का सुरू झाला? एप्रिल फूलचा काय आहे इतिहास जाणून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 01 एप्रिल : 1 एप्रिल 2023. हा दिवस कोणाचीही गंमत करणं, मस्करी करणं, चेष्टा करून एखाद्याला फसवून साजरा केला जातो, असं म्हणायला हरकत नाही. आजच्या दिवशी लोक एकमेकांसोबत थट्टा मस्करी करतात, एकमेकांना फसवतात. तरुणांमधे तर आज खूप उत्साह असतो. आजच्या दिवशी एखाद्याची फसवणूक करण्यासाठी काही जण तर अनेक दिवसांपासून प्लॅनिंग करत असतात. तर हा एप्रिल फूल प्रकार निर्माण कधी झाला किंवा हा दिवस 1 एप्रिललाच का साजरा केला जातो?

तुम्ही मूर्ख दिवसाशी संबंधित अनेक विनोद आणि किस्से वाचले किंवा ऐकले असतील. पण, हा दिवस का साजरा  केला जातो आणि तो पहिल्यांदा कधी आणि का साजरा करण्यात आला हे तुम्हाला माहिती आहे का? चला, जाणून घेऊया एप्रिल फूल डेचा इतिहास आणि त्याच्याशी संबंधित रंजक कथा.

आश्चर्य! याच्या पोटावर चेहरा; गाईच्या अजब वासराला पाहण्यासाठी लोकांच्या रांगा; पाहा PHOTO

इंग्लंडचा (King of England Richard II) राजा रिचर्ड II आणि बोहेमियाची राणी अॅनी (Queen of Bohemia Anne) यांनी त्यांच्या लग्नाची घोषणा केली होती. एंगेजमेंटची तारीख 32 मार्च ठेवण्यात आली होती. ही बातमी ऐकून लोकांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. मात्र, जेव्हा लोकांचं सेलिब्रेशन करून झालं, तेव्हा त्यांना कळलं की कॅलेंडरमध्ये 32 मार्च अशी कोणतीही तारीख नाही. त्यावेळी राजा रिचर्ड आणि राणी अॅनी यांनी आपली मस्करी केली आणि मूर्खात काढलं, असं लोकांच्या लक्षात आलं. आता 32 तारीख नसते म्हणजे ती तारीख झाली 1 एप्रिल, तर तेव्हापासून एप्रिल फूल डे साजरा (April fool day) करण्यास सुरुवात झाली. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय.

याशिवाय आणखी एक मान्यता एप्रिल फूल साजरा करण्यामागे असल्याचं म्हटलं जातं. ही घटना सन 1582 ची फ्रान्स (France) मधील आहे. त्यावेळी चार्ल्स पोपने फ्रान्स ज्युलियन कॅलेंडर (Julian calendar) बदललं आणि त्याच्याजागी नवीन रोमन कॅलेंडर आणलं. त्यानंतर फ्रान्सला नवीन वर्ष वसंत विषुववृत्तात साजरं करायचं होतं आणि तो दिवस होता 1 एप्रिल. पण नागरिकांना (Citizens of France) यामागील योजना समजली नाही आणि ते 1 एप्रिललाच नवीव वर्ष समजू लागले. तेव्हा फ्रान्सचे जवळपास सगळेच नागरिक हे फूल म्हणजेच वेडे ठरले होते. देशातल्या सर्वांचीच मिश्किल फसवणूक झाली होती. तेव्हापासून 1 एप्रिल हा दिवस लोकांना फूल म्हणजेच गमतीत मूर्ख बनवण्यासाठी साजरा केला जातो.

भारतात एप्रिल फूलची सुरुवात कधी झाली?

काही रिपोर्टनुसार, ब्रिटिशांनी हा दिवस भारतात 19व्या शतकात (April fool in India) साजरा करण्यास सुरुवात केली. गेल्या काही वर्षांत तो साजरा करण्याची क्रेझ वाढली आहे.

वेदनेने जोरजोरात किंचाळतात झाडे-वनस्पती; संशोधनात मोठा दावा

सोशल मीडियावरही (Social Media) त्याच्याशी संबंधित मीम्स, जोक्स प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यामुळे आजचा दिवस इतरांची चेष्टा-मस्करी करण्यात नक्की घालवा. पण कोणालाही दुखवू नका.

First published:
top videos

    Tags: Lifestyle, Viral