गाईचं वासरू पाहिलंच की खूप आनंद होतो. हे क्युट वासरू अनेकांना आवडतं. अशाच एका गाईच्या वासराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका गाईने या अजब वासराला जन्म दिला आहे. गाईचं हे वासरू खास आहे. होलेस्टेन फ्रेशिअन प्रजातीचं हे वासरू आहे. या वासराला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होते आहे. कारण याच्या पोटावर चेहरा आहे. अनोखी जन्मखूण घेऊन हे वासरू जन्माला आलं. या वासराची ही जन्मखूप पाहून त्याला हॅप्पी असं नाव ठेवण्यात आलं आहे. या वासराला तुम्ही नीट पाहिलं तर त्याच्या पोटावर एक स्माईली फेस दिसतो आहे. ऑस्ट्रेलियातील वेस्ट गिप्प्सलँडच्या रिपलब्रुकमधील स्टड फार्मवर या वासराचा जन्म झाला.(सर्व फोटो - Reuters Video grab)