ट्रेन चालवताना ड्रायव्हर मोबाईलमध्ये व्यस्त
नवी दिल्ली, 21 एप्रिल : गाडी चालवताना मोबाईलचा वापर करू नये, असं सांगितलं जातं. ट्रेनही याला अपवाद नाही. पण एका ट्रेन ड्रायव्हरने मात्र जे करू नये तेच केलं. ट्रेन चालवताना ड्रायव्हरने मोबाईलचा वापर केला. ट्रेन भरधाव वेगात असताना ड्रायव्हर मोबाईलमध्ये व्यस्त राहिला आणि त्यानंतर भयंकर घडलं. या संपूर्ण घटनेचं भयानक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ट्रेनमध्ये कित्येक प्रवासी असतात. या प्रवाशांचा जीव एका ड्रायव्हरच्या हातात असते. असं असताना या ड्रायव्हरने प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला. ट्रेन चालवत असतानाच हातात मोबाईल घेतला. ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना घडली. व्हिडीओ पाहूनच तुम्हालाही धडकी भरेल.
व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला एक भरधाव ट्रेन जाताना दिसते आहे. ज्या रूळांवरून ही ट्रेन जाते आहे, त्याच रूळांवर समोर दुसरी ट्रेन आहे. त्या ट्रेनला जाऊन ही ट्रेन धडकते आणि याचं कारण म्हणजे ट्रेन ड्रायव्हरचा निष्काळजीपणा. …अन् भरधाव ट्रेनने क्षणात उडवल्या चिथड्या; तुम्ही अशी चूक करत नाहीत ना? अपघाताचा भयंकर LIVE VIDEO ट्रेन ड्रायव्हरचं ड्रायव्हिंगवरील लक्ष मोबाईलवर गेलं आणि हा भयानक अपघात झाला. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता ट्रेन ड्रायव्हरच्या सीटवर एक महिला ड्रायव्हर आहे, जिच्या हातात ट्रेनची कमान आहे. असं असताना ती एका हातात मोबाईल घेऊन त्यामध्ये पाहते आहे. अगदी आरामात ती मोबाईलमध्ये बघते आहे. अचानक समोर दुसरी ट्रेन येते. तिचं लक्ष जातो तोवर खूप उशीर झालेला असतो. ती ट्रेनला सावरणार तोच ती समोरच्या ट्रेनला धडकते. अरे, मग अपघात झाला तरी कसा? हा रहस्यमयी VIDEO पाहून तुम्हीही चक्रावून जाल या दुर्घटनेत सुदैवाने या महिला ड्रायव्हरला तर काही झालेलं दिसत नाही. पण प्रवासी डब्यातीलही व्हिडीओ समोर झाला आहे. जिथं तुम्ही पाहू शकता एका ट्रेनची दुसऱ्या ट्रेनला धडक बसताच प्रवाशी सीटवरून उडून खाली पडले आहेत.
@cctvidiots या ट्विर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. बहुतेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.