JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO: प्रभुदेवाच्या गाण्यावर नाचताना चिमुरडीने फोडला महागडा TV, पाहा नेमकं काय झालं

VIDEO: प्रभुदेवाच्या गाण्यावर नाचताना चिमुरडीने फोडला महागडा TV, पाहा नेमकं काय झालं

एक लहान मुलगी 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ लक्ष्मी चित्रपटातील मोरक्का या गाण्यावर डान्स करत होती. टीव्हीवर हे गाणं सुरू होतं. टीव्ही समोरच उभी राहून ती अभिनेत्री करत असलेल्या डान्स स्टेप्स करण्याचा प्रयत्न करत होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 23 डिसेंबर : सुपरस्टार डान्सर प्रभुदेवा यांच्या गाण्यावर नाचतानाचा एका चिमुरडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका ट्विटर युजरने 30 सेकंदाचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला असून तो आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. चिमुकलीने केलेला डान्स तर व्हायरल झालाच, पण तिने पुढे जे काही केलं त्याने सर्वच जण हैराण आहेत. एक लहान मुलगी 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ लक्ष्मी चित्रपटातील मोरक्का या गाण्यावर डान्स करत होती. टीव्हीवर हे गाणं सुरू होतं. टीव्ही समोरच उभी राहून ती गाण्यातील अभिनेत्री दित्या भांडे करत असलेल्या डान्स स्टेप्स करण्याचा प्रयत्न करत होती. गाण्यातील एका सीनमध्ये अभिनेत्री दित्या बसमध्ये डान्स करत होती. त्यात ती बसच्या हँडलला स्विंग करून पुढच्या डान्सच्या स्टेप्स करते. टीव्हीवर अभिनेत्रीच्याच स्टेप्स फॉलो करणारी चिमुकली, अभिनेत्रीने बसच्या हँडलला काहीसं लटकून स्विंग केल्यानंतर, या चिमुकलीनेही नाचताना टेबलवर ठेवलेल्या टीव्हीला लटकून स्विंग करण्याचा प्रयत्न केला आणि यात टेबलवरचा टीव्हीच खाली आणला. चिमुकलीच्या या डान्सचा व्हिडीओ तिचे पालक शूट करत होते. कोणतीही कल्पना नसताना त्या चिमुकलीने टीव्हीवर केलेलं स्विंग पाहून, स्वत: टेबलच्या टीव्हीला लटकली आणि टीव्हीसह खाली पडली. तिच्या पालकांनी लगेचच तिला उचललं त्यामुळे मोठा अपघात टळला. ट्विटरवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेकांच्या विविध कमेंटही येत आहेत.

संबंधित बातम्या

अनेक जण व्हिडीओ पाहताना चिमुकलीच्या डान्सचं कौतुक करत असतानाच, अचानक झालेल्या या अपघाताने अनेक नेटकरी हैराण असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या