मुंबई, 03 मार्च: प्रेम ही भावना खूप संवेदनशील असते. लक्षावधी लोकं प्रेमात पडतात. एखाद्याची गर्लफ्रेंड असणं किंवा बॉयफ्रेंड असणं ही फार सामान्य बाब झाली आहे. यापैकी काही जण आयुष्यभर परस्परांशी एकनिष्ठ राहतात तर काही जणं कपडे बदलावे तसं जोडीदार बदलत राहतात. मग एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभावा असा धडा त्यांना शिकवला जातो. अशीच घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. यामध्ये एका गर्लफ्रेंडने तिच्या बॉयफ्रेंडला चांगलाच धडा शिकवला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. एमिली झामब्रानो या मुलीचा एक बॉयफ्रेंड होता. तो तिच्याशी रिलेशनमध्ये असतानाच इतर तीन मुलींबरोबरही रिलेशनशीपमध्ये होता. एमिलीला त्याच्या या वागण्याबद्दल शंका होतीच. तिने त्याबाबत विचारलं तर तो नकार द्यायचा. मग एमिलीने तिच्या बॉयफेंडला आयुष्यभर लक्षात राहील अशी शक्कल लढवली आणि त्याला चांगलाच धडा शिकवला आहे. एमिलीने तिच्या बॉयफ्रेंडविरुद्ध पुरावे गोळा केले आणि ते त्याच्याच बेडरूममध्ये चिकटवले. त्यासाठी तिला दोन तास लागले. या सगळ्याचा व्हिडीओ करून तिनी सोशल मीडियावर टाकला आहे. मिररशी संवाद साधताना एमली म्हणाली, ‘मी माझ्या बॉयफ्रेंडला जेव्हा म्हणायची की तो माझ्याशी चिटिंग करतो आहे तेव्हा तो मला म्हणायचा की मी तुझ्यासाठी वेडा आहे. पण मी त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा करून त्याची प्रिंट आउट काढायची असं ठरवलं आणि तसंच केलंही.’ एमिलीने सगळे पुरावे गोळा केले आणि तिचा बॉयफ्रेंड ज्या मुलींसोबत फोटोत दिसत होता त्यातील मुलींचे चेहरे आणि त्यांची नावं तिने यात ब्लर केली आहेत आणि मग फोटोच्या प्रिंट काढल्या. त्या प्रिंट आउट्स तिने बॉयफ्रेंडच्या बेडरूममध्ये भिंतीवर चिकटवल्या आणि या कामाला तिला दोन तास लागले. तिनेया प्रिंट आउट सूपर ग्ल्यूने चिकटवल्या आहेत. अर्थात त्याला कदाचित त्या काढता येणार नाहीत किंवा हे पोस्टर काढण्यासाठी त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे.
बॉयफ्रेंडला केलं ब्लॉक हे सगळं झाल्यावर एमलीने बॉयफ्रेंडला मेसेज केला, ‘तुझ्यासाठी सरप्राईज आहे.’ त्यानंतर तिने बॉयफ्रेंडचा फोन नंबर ब्लॉक केला. बेडरूम पाहिल्यावर बॉयफ्रेंड अवाकच झाला. त्याला चांगला धडा मिळाला. त्यानंतर त्याने एमिलीला मेसेज, व्हॉइस मेसेज आणि कॉल करण्याचा खूप प्रयत्न केला पण एमिलीने त्याच्याशी कुठलेही संबंध ठेवायला नकार दिला आहे. सध्या या व्हिडीओमुळे एमिलीचं कौतुक होत आहे.