JOIN US
मराठी बातम्या / Viral / गर्लफ्रेंड सोडून आईच्या प्रेमात वेडा झाला लेक, तिच्यासाठी बांधला दुसरा 'ताजमहाल'; पाहा VIDEO

गर्लफ्रेंड सोडून आईच्या प्रेमात वेडा झाला लेक, तिच्यासाठी बांधला दुसरा 'ताजमहाल'; पाहा VIDEO

एका मुलाने आपल्या आईसाठी बांधलेला हा ताजमहाल पाहून लोक थक्क झाले आहेत.

जाहिरात

मुलाने आईसाठी बांधला ताजमहाल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चेन्नई, 11 जून : ताजमहाल म्हटलं की शाहजहान आणि मुमताज यांचं प्रेम समोर येतं. मुघल सम्राट शाहजहानने आपली पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ बांधलेला हा ताजमहाल. त्यामुळे तो प्रेमाचं प्रतीक समजला जातो. असा दुसरा ताजमहाल उभारला जाऊ नये म्हणून शाहजहानने तो बांधणाऱ्या मजुरांचे हातही कापले होते, असं सांगितलं जातं. पण आता असा दुसरा ताजमहाल उभा राहिला आहे, पण कोणत्या प्रियकराने प्रेयसीसाठी बांधलेला नाही तर एका लेकाने आपल्या आईसाठी बांधला आहे. ज्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. गर्लफ्रेंड, बायको यांच्यावर प्रेम करून त्यांच्यासाठी काही करणारे बॉयफ्रेंड, नवरे खूप आहेत. पण आईवर असं जीवापाड प्रेम करणारी मुलं मात्र कमीच. असाच एक मुलगा ज्याचं त्याच्या आईवर इतकं प्रेम की तिच्यासाठी त्याने चक्क दुसरा ताजमहाल बांधला. तमिळनाडूतील या मुलाचं आईवरील अनोखं असं प्रेम चर्चेचा विषय बनलं आहे. अमरुद्दीन शेख दाऊद असं या व्यक्तीचे नाव आहे.

अमरूद्दीनेने आपल्या मृत आईच्या स्मरणार्थ ही ताजमहालची प्रतिकृती उभारली आहे. लग्नादिवशीच प्रियकरासोबत फरार झाली नवरी; मग वडिलांनी घेतला असा निर्णय की रंगली चर्चा मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिरुवरूर येथील रहिवासी अमरुद्दीन शेख दाऊदची आई जैलानी बीवी हिचं 2020 मध्ये निधन झालं. अमरुद्दीन आपल्या आईवर खूप प्रेम करायचा. तिच्या मृत्यूमुळे अमरूद्दीनला मोठा धक्का बसला. त्याच्या वडिलांचं 1989 मध्ये निधन झालं होतं, तेव्हापासून त्याच्या आईने एकटीने त्याच्यासह 5 मुलांचा सांभाळ केला. पतीच्या निधनानंतरही तिनं दुसरं लग्न केलं नाही. त्यामुळे तो आपल्या आईला प्रेम आणि शक्तीचे प्रतीक मानत होता. 2020 मध्ये जेव्हा त्याच्या आईचं निधन झालं तेव्हा त्याने तिला कब्रस्तानाऐवजी स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर पुरलं आणि तिच्या स्मरणार्थ तिथं एक स्मारक बांधलं. त्याने ताजमहालची प्रतिकृती बांधली. एकमेकावर जीवापाड प्रेम करतं हे जोडपं, पण चुकूनही एकत्र झोपत नाही, सांगितलं विचित्र कारण ड्रीम बिल्डर्सच्या मदतीने हा ताजमहाल उभारून घेतला. 3 जून 2021 रोजी याचं बांधकाम सुरू झालं. 200 हून अधिक मजुरांनी यात काम केलंआणि 8000 स्क्वेअर फूटमध्ये ताजमहालची प्रतिकृती उभी राहिली.

या ताजमहालसाठी 5.5 कोटींहून अधिक रुपये खर्च झाले, हे पैसे त्याच्या आईनेच त्याच्यासाठी ठेवले होते. पण त्याचा ताजमहाल उभारून त्याने ही इमारत एका चॅरिटेबल ट्रस्टला दान केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या