नवी दिल्ली 11 जून : एका ऑस्ट्रेलियन मॉडेलने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक धक्कादायक खुलासा केला आहे. मॉडेलने केलेल्या या खुलाशामुळे तिला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्या सर्वांनाच धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथील ही महिला दोन मुलांची आई आहे. तिने सांगितले की ती गेल्या 8 वर्षांपासून तिच्या पतीसोबत झोपत नाही आणि त्याच्यापासून अंतर ठेवते. महिलेने तिची बेडरूम पूर्णपणे वेगळी केली आहे. तिने स्वतः सांगितलं की ती कधीही तिच्या पतीसोबत बेड शेअर करत नाही. महिलेचा हा खुलासा ऐकल्यानंतर अनेक युजर्सच्या मनात विचार आला की तिला असं का करावं लागलं? यामागे काय कारण आहे? मॉडेलचं वय 24 वर्षे असून तिचं नाव कोले झेपानोव्स्की आहे. कोले दोन मुलांची आई. तिच्या
पतीचं
नाव मिच ओरवल आहे. हे कपल सोशल मीडियावर भरपूर लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर कोलेचे 6 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित हे रहस्य उघड करताना मॉडेलने सांगितलं की, तिच्या पतीसोबत न झोपण्यामागे एक मोठं कारण आहे.
तक्रार द्यायला पोलिसांत गेलेली महिला पतीसमोर आरोपीसोबतच फरार; पोलीसही शॉक होऊन बघत राहिले
कोलेने सांगितलं की ओरवल चुकीच्या पद्धतीने झोपतो. तो घोरतो. त्याची झोपण्याची पद्धत एखाद्या प्राण्यासारखी आहे. यामुळे मुलांना खूप त्रास होतो. त्यांना झोप लागत नाही. यामुळेच कोले गेल्या 8 वर्षांपासून पतीपासून वेगळं झोपत असून, तिची बेडरूमही वेगळी केली आहे. ओरवल सोफ्यावर झोपतो. मॉडेल तिच्या मुलांसोबत बेडवर झोपलेली असते.
8 वर्षांपासून हे जोडपं एकमेकांसोबत झोपत नाही
कोलेने याला परस्पर समंजसपणाची बाब म्हटलं आहे. एका फॉलोअरने तिला विचारलं की, “मुलांच्या जन्मानंतर तुझं आणि मिचचं नातं कसं आहे?”, कोलेने उत्तर दिलं, की आमचं नातं परफेक्ट नाही. आम्ही वाद घालतो. भांडण करतो. डिस्कनेक्ट होतो. मात्र आम्ही दोघं एकमेकांना समजून घेतो.