प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)
नवी दिल्ली, 15 एप्रिल : बर्थडे म्हटलं की सेलिब्रेशन आलंच. वाढदिवस साजरा करताना काहीतरी हटके करण्याकडेही कल असतो. पण असं काहीतरी हटके करण्याच्या नादात तुमचा जीवही धोक्यात येऊ शकतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. वाढदिवस साजरा करणं कित्येकांना चांगलंच महागात पडलं आहे. एक छोटीशी चूक आणि या व्यक्तींसोबत भयंकर घडलं आहे. बर्थडे म्हटला की केक आणि कँडल आलंच. पण याशिवायही सध्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी बरंच काही उपलब्ध आहे. त्यापैकी एक म्हणजे स्नो स्प्रे. ज्यातून पांढऱ्या रंगाचा दाट फेस बाहेर पडतो. कित्येक पार्टी किंवा कार्यक्रमात या स्प्रेचा वापर केला जातो. पण हा स्प्रे किती भयानक ठरू शकतो, याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल.
आता या व्हिडीओत पाहा, कित्येक लोकांच्या बर्थडेला हा स्प्रे वापरण्यात आला आहे आणि त्यांच्यासोबत भयानक घडलं आहे. स्प्रे मारून कँडलजवळ जाताच अचानक आग लागली आहे. ज्यांच्या अंगावर स्प्रे होता, त्यांच्या अंगाला, ज्यांच्या केसांवर स्प्रे होता, त्यांच्या केसांनी पेट घेतला. म्हणजे जितक्या भागावर हा स्प्रे आहे, तितका भाग आगीच्या संपर्कात येतात, आगीच्या विळख्यात आला. …अन् भरधाव ट्रेनने क्षणात उडवल्या चिथड्या; तुम्ही अशी चूक करत नाहीत ना? अपघाताचा भयंकर LIVE VIDEO व्हिडीओ पाहूनच आपल्याला धडकी भरते. व्हिडीओच्या शेवटीही याचा डेमो दाखवण्यात आला आहे. एका ठिकाणी हा स्प्रे मारून त्याला आग लावण्यात आली, तेव्हा या स्प्रेने पेट घेतल्याचं दिसतं. म्हणजे या स्प्रेमध्ये असं केमिकल आहे, जे आगीच्या संपर्कात येताच पेट घेतं. त्यामुळे यापुढे स्नो स्प्रे वापरताना सावध राहा. असं सेलिब्रेशन जीवावर बेतू शकतो. गंभीर भाजलं गेल्यास मृत्यूही ओढावू शकतो. बर्थडे सेलिब्रेशनच्या दिवशी असं काही घडलं तर तुमचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील शेवटचा दिवस ठरू शकतो. त्यामुळे आताच सावध राहा. जी वेळ या लोकांवर आली ती तुमच्यावर येऊ देऊ नका. चुकूनही प्राण्यांसोबत असे वागू नका, अन्यथा मोजावी लागले मोठी किंमत पाहा PHOTOS @jogi_picsjp इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
ही बातमी तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवू नका. जास्तीत जास्त लोकांना शेअर करून याबाबत त्यांनाही जागरूक करा.