सापाचा हल्ला (फोटो - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब)
नवी दिल्ली, 01 जुलै : सापाचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. काही लोक तर सापा शी असे खेळतात जणू काही खेळणंच. अगदी लहान लहान मुलंही सापासोबत खेळतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. कुणी सापासोबत झोपतं, कुणी सापावर बसतं, कुणी सापाला आपल्या मांडीवर घेतं, तर कुणी सापाला गळ्यात लटकवतं. अशाच एका व्यक्तीने साप आपल्या गळ्यात लटकवला. हा काहीच करणार नाही, असं तो सांगत होता आणि तेव्हाच सापाने त्याच्या मानेला चावा घेतला. सापाच्या हल्ल्याचा हा लाइव्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एक व्यक्ती एका लाइव्ह टीव्ही शोवर सापाबाबत माहिती देत होती. त्यावेळी त्या व्यक्तीने सापाला आपल्या गळ्यात लटकवलं होतं. याच सापाबाबत ती व्यक्ती माहिती देत होती. सापाबाबत त्याने काय काय सांगितलं तेव्हाच त्याच्या गळ्याभोवती गुंडाळलेल्या सापाने त्याच्या मानेला चावा घेतला.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता टीव्ही-शोमध्ये गळ्यात साप लटकवेली व्यक्ती आणि सोबत महिला अँकर दिसते आहे. व्यक्ती अँकरला गळ्यातील सापाबाबत माहिती देतो आहे. त्याच्याकडे बोट करत, हा काही करणार नाही, खतरनाक नाही, मला खाणार नाही, त्याच्यात विष नाही, असं काय काय त्याने सांगितलं. Shocking! अंधारात टॉयलेटमध्ये गेली व्यक्ती, छिद्रात चमकताना दिसले डोळे; लाइट लावताच… साप त्याच्या गळ्याभोवती गुंडाळलेला आहे.सुरुवातीला सापाचं तोंड त्याच्या छातीच्या दिशेने आहे. व्यक्ती बोलत असताना हा साप हळूच आपलं तोंड वर नेतो. त्याच्या मानेजवळ जातो आणि आपल्या विळख्याच्या आत जाऊन त्या व्यक्तीची मान आपल्या तोंडात धरतो. त्याचक्षणी व्यक्तीच्या चेहऱ्यावर थोडी भीती दिसते. पण तरी तो लगेच प्रतिक्रिया देत नाही. तसाच शांत राहतो. अँकरला आपल्याला साप चावल्याचं सांगतो. तेव्हा अँकरही घाबरते. ती व्यक्ती कॅमेरामॅनला कॅमेरा झूम करायला सांगते. तेव्हा तुम्ही पाहाल तर त्या व्यक्तीच्या मानेची त्वचा सापाच्या तोंडात आहे. सापाने अगदी घट्ट पकडून ठेवलं आहे. ती व्यक्ती सापाला आपल्या हातांनी स्पर्श करते, तसा तो साप व्यक्तीची मान आपल्या तोंडातून सोडतो. यानंतर ती व्यक्ती आपलं बोलणं सुरूच ठेवते. VIRAL VIDEO - छाती ताणून महाकाय सापाला पकडायला गेले पण…; शेवट एकदा पाहाच @historyinmemes ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओतील व्यक्ती स्टिव्ह इर्व्हिन आहे. तो एक प्रसिद्ध प्राणीशास्त्रज्ञ होता. मगरीचा रक्षक, ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध झू किपरही होता.
त्याचे टीव्हवरील शो खूप गाजले. हा व्हायरल व्हिडीओ 1991 मधील ऑस्ट्रेलियन टीव्ही शोचा आहे. स्टिव्हचा मृत्यू स्टिंग रे माशाने दंश केल्याने झाला.