नवी दिल्ली, 01 जुलै : रात्री अचानक तुम्हाला टॉयलेट ला झाली. तुम्ही झोपेतून उठलात आणि घाईघाईत लाईट न लावताच टॉयलेटमध्ये गेलात. तिथं छिद्रात तुम्हाला काहीतरी चमकताना दिसलं… तर तुमचं काय होईल… फक्त वाचून कल्पना करूनच तुम्हाला घाम फुटला असेल. याचा प्रत्यक्ष अनुभव एका व्यक्तीने घेतला. ही व्यक्ती अंधारात टॉयलेटमध्ये गेली. तिला छिद्रात डोळे चमकताना दिसले. लाईट लावून पाहताच जे दिसलं ते पाहून तो थरथर कापू लागला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. इंडियन टॉयलेटचाच हा व्हिडीओ आहे. आजपर्यंत जे वेस्टर्न टॉयलेटमध्ये दिसून आलं ते आता इंडियन टॉयलेटमध्ये दिसल्याने धडकीच भरली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कदाचित यानंतर तुम्हीही टॉयलेटमध्ये जायला घाबराल. असं या व्यक्तीला टॉयलेटमध्ये नेमकं काय दिसलं हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता इंडियन टॉयलेटच्या सीटमध्ये काहीतरी चमकतं आहे. दोन छोटे वर्तुळ चमकत आहेत. थोडं जवळ गेल्यानंतर ते चमकणारे डोळे असल्याचं दिसतं. आणखी थोडं पुढे गेल्यावर जे दिसतं ते पाहून पायाखालची जमीनच सरकेल. त्या छिद्रात दुसरं तिसरं कुणी नाही तर चक्क एक साप आहे. जो वर डोकावून पाहतो आहे.
तहानेने व्याकूळ होता जंगलाचा राजा सिंह, माणसाने हाताने पाणी पाजलं; VIDEO चा शेवट असा की…
तुम्ही आजपर्यंत सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, ज्यामध्ये वेस्टर्न टॉयलेट सीटमधून साप येताना पाहिलं असेल. वेस्टर्न टॉयलेट खुर्चीसारखे असतात, त्यावर बसलं जातं. त्यामुळे साप टॉयलेटच्या गोलाकार भागात लपून बसून चावण्याचा धोका असतो. त्यामुळे असे व्हिडीओ पाहिल्यावर आपला इंडियन टॉयलेट बरा असं तुम्हाला वाटलं असेल. पण आता इंडियन टॉयलेटमध्येही हा धोका आहे, हे या व्हिडीओतून दिसून येतं. सुदैवाने इथं सापाचं डोकंही दिसत होतं, त्यामुळे तो साप असल्याचं समजलं.
VIRAL VIDEO - छाती ताणून महाकाय सापाला पकडायला गेले पण…; शेवट एकदा पाहाच
हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे हे माहिती नाही. एक्सप्लोरिंगविल्ड_ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. लिंडसे आणि डेव्हिड नावाच्या दोन ट्रॅव्हल एक्सप्लोरर्सद्वारे हे अकाऊंट चालवलं जातं. या अकाउंटवर तुम्हाला वन्यजीवांशी संबंधित अनेक फुटेज पाहायला मिळतील.
व्हायरल होत असलेल्या या सापाचा व्हिडिओ आतापर्यंत अनेकांनी पाहिला आहे. भविष्यात इंडियन टॉयलेटमध्र्ये बसण्यापूर्वी नीट तपासून घ्या, असा सल्ला अनेक युझर्सनी दिला आहे.