नवी दिल्ली, 28 जून : सापाचे आजवर तुम्ही बरेच व्हिडीओ पाहिले असतील. ही व्हिडीओ पाहून अंगावर अक्षरशः काटा येतो. असाच एक सापाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. जो पाहून तुमच्या छातीत धडकी तर भरेलच. पण हसून हसून पोटही दुखेल. आता सापाचा असा कोणता व्हिडीओ आहे हे पाहण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. चला तर मग पाहुयात. एखाद्या ठिकाणी साप दिसला, की त्याला पकडण्याची धडपड होतो. या व्हिडीओतही सापाला पकडण्याचा प्रयत्न केला जातो आहे. एका झुडुपामध्ये साप घुसला आहे. काही लोक तिथं त्याला पकडण्यासाठी जातात. अगदी छाती ताणून, आपण सापाला घाबरत नाही अशा रूबाबात ते सापाजवळ जातात खरं. पण शेवटी जे घडलं ते पाहण्यासारखं आहे. Viral News : एकही साप नाही, काय आहे या ठिकाणचे रहस्य? व्हिडीओत तुम्ही पाहू शकता तीन व्यक्ती तिथं दिसत आहेत. एकाने हातात काठी घेतली आहे. तिथंच एक साप दडून बसला आहे. त्याला ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. मोठमोठ्याने ओरडतात जेणेकरून तो आवाज ऐकून बाहेर येईल. सुरुवातीला साप शांत आहे. पण काही वेळातच तो असा बाहेर येतो की त्याला पकडायला आलेले सर्वजण घाबरतात. साप पकडण्यासाठी आलेले साप बाहेर येताच तिथून पळ काढतात. जो तो ओरडत, आपला जीव मुठीत धरून धूम ठोकतो. काही लोक झाडावरही चढलेले या व्हिडीओत दिसत आहेत. साप इतका मोठा आहे तो जसा बाहेर येतो, तसा आपल्या अंगावर काटा येतो. तो ज्या वेगाने बाहेर येतो, तो वेगही धडकी भरवणारा आहे. Viral Video : पिल्लांचा जीव वाचवण्यासाठी सापाशी भिडली आई; शेवट पाहून नेटकरीही झाले भावूक @earth.reel नावाच्या इन्स्टा पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. काही जणांनी हा व्हिडीओ पाहून आपल्याला भीती वाटल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी आपल्याला हसू फुटल्याचं सांगितलं.
तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं, ते आपली प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.