JOIN US
मराठी बातम्या / Viral / बिनडोक्याचा डॉग पाहून सर्वांना धक्का! पण VIRAL PHOTO मागील सत्य काही औरच; तुम्ही सांगू शकाल का?

बिनडोक्याचा डॉग पाहून सर्वांना धक्का! पण VIRAL PHOTO मागील सत्य काही औरच; तुम्ही सांगू शकाल का?

धडावर डोकं नसलेल्या कुत्र्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

जाहिरात

धडावर डोकं नसलेला श्वान (फोटो: Twitter/@arthurdeverdade)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 जून : सोशल मीडियावर काही असे व्हिडीओ-फोटो व्हायरल होतात ज्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. असाच एक फोटो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. एका कुत्र्या चा हा फोटो आहे. ज्यात कुत्रा जिवंत आहे पण त्याला डोकं नाही. कुत्र्याच्या धडावर शीर नाही आहे. हा बिनडोक्याचा श्वान पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. पण खरंतर या फोटोमागील सत्य काही औरच आहे. सोशल मीडियावर डॉगचे बरेच व्हिडीओ असतात. कधी माणसांना मदत करणारे, कधी आपल्या क्युटनेसने सर्वांचं मन जिंकणारे श्वान असे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील पण शीर नसलेल्या या श्वानाचा फोटो पाहून मात्र सर्वांनाच धडकी भरली आहे.   फोटो तुम्ही नीट पाहाल तर एका ठिकाणी हा कुत्रा बसलेला दिसतो आहे. त्याचे तीन पाय दिसत आहे. पण डोकं नाही आहे. डोक्याच्या भागाकडे टाके मारलेले दिसत आहेत. पण तरी श्वान जिवंत आहे. हा असा कुत्रा पाहून कुणाला भीती वाटेल नाही तर काय… त्यामुळे सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल होतो आहे. VIDEO - Oh So Cute! पुष्पा म्हणताच डॉगीने काय केलं पाहा; याच्यासमोर तर तुम्ही नक्कीच झुकाल पण तुम्ही फोटो नीट पाहा मग तुम्हालाही या फोटोचं खरं सत्य समजेल. या श्वानाला डोकं नाही असं नाही. तर तो अशा स्थिती बसला आहे की त्याचं डोकं दिसत नाही आहे. म्हणजे तो श्वान आपल्या पाठ किंवा शेपटी चाटतो आहे, यासाठी त्याने आपलं डोकं मागे नेलं आहे. त्याच्या शरीरावर जे टाके दिसत आहेत. ते खरं आहेत. पण ते डोक्याकडील भागाचे नव्हे तर पायाकडील भागाचे आहेत. म्हणजे जिथून पाय सुरू होतो, तिथं हे टाके आहेत. या श्वानाचा पुढील एक पाय नाही आहे. तो अपंग आहे. पण जेव्हा तो आपली मान मागे वळवतो तेव्हा टाक्यांचा भाग डोक्याकडील असल्यासारखा वाटतो आणि तो डोकं नसलेला कुत्रा दिसतो. विकृतीचा कळस! 20 वर्षांच्या मुलाचे पाळीव श्वानासोबत शारीरिक संबंध; हादरलेल्या आईने अडवताच तिलाही… काही जणांनी हे ग्राफिक्सच्या मदतीने समजावून दाखवलं आहे. या पोझिशनमध्ये आहे श्वान (फोटो: Twitter/@JulieWi46736140)

या पोझिशनमध्ये आहे श्वान (फोटो: Twitter/@JulieWi46736140)

दरम्यान या कुत्र्याचा मूळ फोटोही कुणीतरी या ट्विटर पोस्टला कमेंट करताना पोस्ट केला आहे. हा श्वान खरा असा दिसत असल्याचा दावा (फोटो: Twitter/@kaylamarie413)

हा श्वान खरा असा दिसत असल्याचा दावा (फोटो: Twitter/@kaylamarie413)

द सन वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, @arthurdeverdade या ट्विटर अकाउंटवर काही वर्षांपूर्वी हा फोटो पोस्ट करण्यात आला होता, जो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या