नवी दिल्ली, 09 जून : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा फिल्मने सर्वांनाच वेड लावलं होतं. यातील ‘पुष्पा मैं झुकेगा नहीं…’ हा डायलॉग तर खूपच प्रसिद्ध झाला. अजूनही पुष्पाचा फिव्हर संपला नाही. रस्त्यावरील एक डॉगी ज्याला एका महिलेने पुष्पा म्हणून हाक मारली. त्यानंतर या डॉगीने जे केलं ते पाहून तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल आणि त्याच्यासमोर मात्र झुकण्यापासून तुम्हीही स्वतःला रोखू शकणार नाही. या डॉगीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका ठिकाणी शांत बसलेला हा डॉगी. ज्याला एक महिला अचानक पुष्पा म्हणून हाक मारते. त्यानंतर तो जे करतो, ते पाहातच राहावं असं वाटतं. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक कुत्रा पाठमोरा बसला आहे. एक महिला मागून येते आणि पुष्पा म्हणून हाक मारते. जसं त्या श्वानाच्या कानावर पुष्पा नाव पडतं. तसं तो लगेच मागे वळून पाहतो. ताडकन उठून उभा राहतो आणि ग्रिलमधून आपलं डोकं बाहेर काढतो. त्यानंतर तिथून खाली उतरून तो धावत त्या महिलेकडे येतो. नादच करायचा नाय! पठ्ठ्याने चक्क कुत्र्यासाठी बांधलं 20 लाखांचं घर; पाहा Luxury Dog House चे PHOTO श्वान जवळ येताच महिला त्याला प्रेमाने जवळ घेते. त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. त्याला खूप खूप प्रेम करते. श्वानही त्या महिलेला पाहून खून आनंदी होतो. आपली शेपटी हलवत तो आपला आनंद दाखवतो. कित्येक दिवसांनी ते दोघं एकमेकांना भेटले. श्वानही जणू शांत बसून या महिलेची वाट पाहत होता आणि जशी ती आली तसा त्यालाही उत्साह चढला. श्वानाला पाहिलं तर तो पाळलेला श्वान नाही तर भटका श्वान आहे. पण त्याच्यावर या महिलेचं आणि महिलेवर त्याचं प्रेम पाहून सर्वांनाच कौतुक वाटतं आहे. ‘पुष्पा मैं झुकेगा नही…’ असं असलं तरी पुष्पा इतकी क्युट असेल तर कुणीही तिच्यासमोर हसत हसत झुकेल. हो की नाही? चर्चा तर होणारच! कुत्र्याच्या बर्थडेला 11 किलोचा केक, रिटर्न गिफ्ट फ्रिज; भारतात झालं जंगी सेलिब्रेशन @soulforstrays इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.