JOIN US
मराठी बातम्या / Viral / सी व्हॅम्पायर! रक्त शोषणारा जगातील सर्वात क्रूर मासा; पाहूनच उराड धडकी भरेल

सी व्हॅम्पायर! रक्त शोषणारा जगातील सर्वात क्रूर मासा; पाहूनच उराड धडकी भरेल

Blood sucking fish: पृथ्वीप्रमाणेच समुद्रातही असे अनेक जीव आहेत, जे पाहून विश्वास बसणार नाही.

जाहिरात

सर्वात क्रूर मासा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 एप्रिल : समुद्राखालची जीवसृष्टी अद्भुत आहे. विविध प्रकारचे मासे, शैवाल, वनस्पतींसह विविध जलचर प्राण्यांनी समुद्राखालचं विश्व समृद्ध आहे. आजही संशोधक या जीवसृष्टीतल्या अनेक गोष्टींवर संशोधन करत असले तरी माणूस बऱ्याच गोष्टींपर्यंत अद्याप पोहोचलेला नाही. व्हेल, शार्कसारखे मासे आजही संशोधकांसह पर्यटकांचं आकर्षण आहेत. नेदरलँडमध्ये काही दिवसांपूर्वी अशा एका अतिदुर्मीळ आणि काहीशा विचित्र माशाचं दर्शन संशोधकांना घडलं. हा मासा रक्त शोषणारा म्हणून ओळखला जातो. तो अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असतो. सुमारे सहा वर्षांनंतर हा मासा समुद्र किनाऱ्यावर आढळून आला. त्याला सी व्हॅम्पायर असं म्हणता येईल. कारण तो रक्त शोषण्याचं काम करतो. हा मासा नेमका कसा असतो, ते सविस्तर जाणून घेऊ या.

समुद्राच्या पोटात अनेक रहस्यं दडलेली आहेत. ती वादळं किंवा त्सुनामीसारख्या कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत जगासमोर येतात. काही दिवसांपूर्वी नेदरलँडमध्ये असाच एक दुर्मीळ मासा अचानक दिसला आणि त्याचा फोटो काढण्यासाठी किनाऱ्यावर एकच गर्दी उसळली. या माशाला जगातला सर्वांत प्राणघातक मासा म्हटलं जातं. कारण तो रक्त शोषतो. याआधी हा मासा सहा वर्षांपूर्वी दिसला होता. त्यानंतर तो आता दिसला आहे. हा मासा मांसाहारी परजीवी असून, आपल्या दातांनी तो शिकार करतो. या माशाला लॅम्प्रे असं म्हणतात. वाचा - विना झोपता तुम्ही किती काळ राहू शकता? तज्ज्ञांकडून आश्चर्यचकीत करणारे खुलासे आपल्या शिकारीचं रक्त शोषून ते पिणारा हा सी लॅम्प्रे मासा मायावी मानला जातो. यापूर्वी तो 2017मध्ये एका बेटावर सापडला होता. त्यानंतर तो एका दुसऱ्या प्राण्याच्या तोंडात दिसला होता. त्यानंतर मात्र हा मासा परत आढळला नाही. हा रक्त शोषणारा परजीवी फक्त दुसऱ्या प्राण्याच्या तोंडात दिसत असे. तज्ज्ञांच्या मते, तीन फूट लांबीचा हा मासा खूप प्राचीन आहे. तो पृष्ठवंशी प्राण्यांच्या सर्वांत जुन्या अग्नाथा गटाशी संबंधित आहे. हे जीव 400 दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात होते. तेव्हा जबडा असलेले मासे यापेक्षाही मोठ्या आकाराचे होते. यूकेमधल्या `मेट्रो` या न्यूज वेबसाइटवर प्रकाशित वृत्तानुसार, काही सागरी जीवशास्त्रज्ञ नेदरलँड्सच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरत असताना त्यांच्यामुळे या दुर्मीळ आणि रक्त शोषणाऱ्या माशाबद्दल जगाला माहिती मिळाली. एका सुंदर डच बेटावर चालत असलेल्या एका शास्त्रज्ञाला समुद्रकिनाऱ्यावर विसावलेल्या दुर्मीळ लॅम्प्रे माशाचं दर्शन झालं. `सुरुवातीला तो जगातला सर्वांत धोकादायक आणि दुर्मीळ व्हॅम्पायर मासा आहे यावर त्याचा विश्वासच बसला नाही. हा जबडा नसलेला मासा असून, त्याचे दात खूप धोकादायक आहेत. तो दिसायला व्हेलसारखा असतो; पण त्याचे तोंड चकतीच्या आकाराचं असून, त्यात तीक्ष्ण दात असतात,` असं या जीवशास्त्रज्ञानं सांगितलं. हा मासा नंतर एका नेचर म्युझियमकडे सुपूर्द करण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या