मुंबई : आपल्याकडे झोपाळू माणसाला आळशी मानलं जातं, पण तुम्हाला माहितीय का की झोप आपल्या आयुष्यात किती महत्वाची गोष्ट आहे. जर तुम्हाला झोपच आली नाही तर ही एक गंभीर समस्या आहे. डॉक्टरांच्या मते, प्रत्येक 24 तासांनी किमान सहा तास झोपणे आवश्यक आहे. झोप येत नसेल तर मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा, नैराश्य अशा अनेक समस्या उद्भवतात. खरंतर आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना झोपायला किंवा आराम करायला वेळ मिळत नाही. तसेच लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांचा दिवस इतका व्यस्त असतो की फार कमी झोप त्यांना मिळते. पण ही खरंतर धोक्याची घंटा आहे. सकाळी दात न घासता पाणी पिणे योग्य की अयोग्य? न्यू यॉर्कच्या माउंट सिनाई हॉस्पिटलचे डॉ ओरेन कोहेन सांगतात की, एखादी व्यक्ती 24 तास झोपेशिवाय काम करू लागली की, मेंदू त्याला आता झोपायला हवे असे संकेत देतो. कॅलिफोर्नियातील 17 वर्षीय रँडी गार्डनर 11 दिवस 25 मिनिटे झोपला नाही कारण त्याला विज्ञान प्रकल्प बनवायचा होता. या विद्यार्थ्याने 1963 मध्ये हा विश्वविक्रम केला होता. अनेकांनी हा विक्रम मोडल्याचा दावा केला. 1986 मध्ये, रॉबर्ट मॅकडोनाल्ड 18 दिवस आणि जवळजवळ 22 तास झोपेशिवाय काढले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 1997 पासूनच्या अशा कामगिरीचा समावेश नाही. कारण त्यांचा असा विश्वास आहे की झोप न लागणे हा एक आजार आहे आणि त्याचे अनेक धोके आहेत. कॅलिफोर्निया विद्यापीठातील स्लीप डिसऑर्डर सेंटरचे प्रमुख अॅलॉन एडविन यांच्या मते, ज्या लोकांना पुरेशी झोप मिळत नाही, ते सूक्ष्म झोपेच्या स्थितीत असतात. ते जागे असल्यासारखे दिसतात पण त्यांचा मेंदू नकळत एक प्रकारची असामान्य झोपेत जातो. म्हणूनच जर कोणी म्हणत असेल की तो आठवडे झोपला नाही, तर ते चुकीचे आहे. कारण झोपल्याशिवाय जगणे जवळजवळ अशक्य आहे. कोणी झोपल्याशिवाय २४ तासांपेक्षा जास्त राहूच शकत नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. एलोन एडविनच्या मते, जर एखाद्याला झोप येत नसेल तर ते शरीरासाठी घातक आहे. निद्रानाश अनेक रुग्णांमध्ये अनुवांशिक आहे. त्यांच्या मेंदूमध्ये असामान्य प्रथिने जमा होऊ लागतात आणि हळूहळू झोप खराब होऊ लागते आणि अखेरीस माणसाचा मृत्यू होतो. अशा रोगाने ग्रस्त रुग्ण सरासरी 18 महिन्यांपेक्षा जास्त जगू शकत नाहीत.
हात आणि डोळ्यांचा समन्वय कमी होतो. यामुळे किमान प्रतिसाद देण्याची क्षमता कमी होते. लक्ष भटकते. यापूर्वी 1989 मध्ये उंदरांवर संशोधन करण्यात आले होते. असे आढळून आले की प्राणी केवळ 11 ते 32 दिवसांपर्यंत झोपू शकत नाहीत. यापेक्षा जास्त वेळ ते जागे राहिल्यास त्यांचा मृत्यू होतो.