सोर्स : सोशल मीडिया
मुंबई, 04 जून : तुम्हाला माहितीय का की जगात एक असा देश आहे. जिथे सर्वाधिक गरीबी आहे. येथील लोकांना काम मिळत नाही शिवाय एक वेळेच्या खाण्याचेही त्यांचे वांदे झाले आहे. हा देश आहे बुरुंडी. पूर्व आफ्रिकेतील या देशात अमेरिका आणि ब्रिटन या दोघांची सत्ता आहे. 1996 मध्ये देश स्वतंत्र झाला आणि तेथे जातीय संघर्ष सुरू झाला. यानंतर तेथील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली. ज्यामुळे येथील लोक आजही फार गरीब आहेत. अनेक वर्षापासून बंद होती खोली, जेव्हा उघडलं तेव्हा समोर आली रहस्यमय गोष्ट जगातील अनेक श्रीमंत देशांबद्दल तुम्ही ऐकले असेल. पण आज जगातील सर्वात महागड्या देशाबद्दल काही आश्चर्यकारक माहिती जाणून घेऊ. जगातील सर्वात गरीब देशांतील लोक कसे राहतात हे तुम्हाला माहिती आहे का? गरिबीची वेदना समजून घेण्यासाठी बुरुंडीतील परिस्थिती पाहावी लागेल. जगातील गरीब देशांमध्ये बुरुंडीचा क्रमांक पहिला लागतो. या देशाची लोकसंख्या सुमारे 12 दशलक्ष म्हणजे 1 कोटी 20 लाख आहे, त्यापैकी 85 टक्के लोकांना तर गरिब बोलता येणार नाही कारण ते पूर्णपणे दारिद्र्यात आहेत. जगातील अशी ठिकाणं जेथे विमान उड्डाणावर बंदी, भारतातील ‘या’ भागाचाही समावेश या देशातील बहुतांश लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकीकडे जग चंद्र आणि मंगळावर जीवसृष्टीचा शोध घेत आहे. त्याचवेळी पृथ्वीवरील या देशात लोकांना जीवन जगण्यासाठी मूलभूत सुविधा मिळत नाहीत. 1996 ते 2005 या काळात बुरुंडीमधील मोठ्या वांशिक संघर्षाने लाखो लोकांचा बळी घेतला आणि अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली. हळूहळू हा देश आर्थिकदृष्ट्या मागास होत गेला आणि जगातील सर्वात गरीब देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आला. बुरुंडीशिवाय मादागास्कर, सोमालिया आणि मध्य आफ्रिकन रिपब्लिकसह अनेक देश गरिबीशी झुंज देत आहेत. रूही सेनेट या यूट्यूब चॅनलनुसार, या देशातील लोकांचे वार्षिक उत्पन्न 180 डॉलर्स म्हणजे वर्षाला 14 हजार रुपये आहे. येथे दर 3 लोकांपैकी एक बेरोजगार आहे आणि दिवसभर कष्ट करूनही लोकांना दररोज 50 रुपये कमावता येत नाहीत. यूएन आणि इतर संस्था जगभरातील अनेक गरीब देशांसाठी अनेक प्रकारच्या मोहिमा चालवतात. असे असूनही बुरुंडीसह जगातील अनेक देशांतील परिस्थिती सुधारलेली नाही.