जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अनेक वर्षापासून बंद होती खोली, जेव्हा उघडलं तेव्हा समोर आली रहस्यमय गोष्ट

अनेक वर्षापासून बंद होती खोली, जेव्हा उघडलं तेव्हा समोर आली रहस्यमय गोष्ट

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

त्या सीलबंद लाकडी दरवाजामध्ये काय दडलं आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वच लोक उत्सूक आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 04 जुन : कधी कधी अशा काही गोष्टी सोशल मीडियावर पाहायला किंवा ऐकायला मिळतात की त्यांच्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण होऊन बसतं. असाच एक प्रकार एका महिलानं मांडला, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य. एका महिलेने तिच्या मृत्यूनंतर तिच्या आजीच्या घरात एक ‘गूढ खोली’ उघडली आणि तिने जे पाहिले ते पाहून तिला धक्काच बसला. डायन फ्लोरेस असे या महिलेचे नाव आहे. तिनी सांगितले की, त्यांच्या आजीने सांगितले होते की त्यांच्या आजीच्या मृत्यूनंतर ही खोली बंद करण्यात आली होती आणि यापुढेही बंद राहील. 20 वर्षांपासून खोलीचा दरवाजा उघडलाच नव्हता. आता डायनाच्या आजीचेही निधन झाल्यानंतर तिने आपल्या भावंडांसह तो दरवाजा उघडण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर त्यांच्या समोर जे गोष्ट दिसलं त्यामुळे त्यांना धक्का बसला. आता असं म्हटल्यानंतर त्या सीलबंद लाकडी दरवाजामध्ये काय दडलं आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वच लोक उत्सूक आहेत. खरंतर या दरवाज्याच्या मागे त्यांना अनेक कॅथलिक मूर्ती दिसल्या. याशिवाय धार्मिक चित्रे आणि काही पेट्याही सापडल्या. खोलीत जुने फर्निचर आणि सजावटही होती. डायन म्हणते, ‘दरवाज्याच्या आत अनेक धार्मिक गोष्टी होत्या, अनेक गोष्टींचा ढीग होता.’ सर्वांनी मिळून खोली स्वच्छ केली. आता भविष्यात या खोलीला पुन्हा नव्याने तयार करण्याचा विचार आहे. खोली 20 वर्षांपासून बंद पडून होती, त्यामुळे ती तेव्हाची तशीच दिसते. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल झाले आणि लाखो लोकांनी पाहिले. यावर लोक खूप कमेंट देखील करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात