JOIN US
मराठी बातम्या / Viral / उगाच मुलींना म्हणत नाहीत पापा की परी; हा VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल

उगाच मुलींना म्हणत नाहीत पापा की परी; हा VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल

एका चिमुकल्या लेकीने बाबासाठी जे केलं ते पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.

जाहिरात

बापलेकीचा व्हिडीओ व्हायरल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 03 मे : मुलगा असो वा मुलगी आईवडील दोघांचंही आपल्या मुलांवर तितकंच प्रेम असतं. पण दोघांमधील एक म्हणायचं तर मुली सर्वात जास्त लाडक्या असतात त्या आपल्या बाबांच्या आणि मुलीचंही आपल्या बाबांवर खूप प्रेम असतं. म्हणून तर मुलींना पापा की परी म्हटलं जातं. आतापर्यंत पापा की परी म्हणून मुलींचे मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण आता अशा एका पापा की परीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहिल्यावर तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. मुलीला धनाची पेटी, घरची लक्ष्मी म्हणतात. नशीबवानांच्या घरात मुलगी जन्माला येते किंवा ज्या घरात मुलीचा जन्म होतो ते लोक नशीबवान असतात, असं अनेक जण म्हणतात. तसं असं का म्हणतात याचा प्रत्यय प्रत्यक्षात अनेकांना वारंवार आला असेलच पण असाच एक व्हिडीओही सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. एका चिमुकल्या लेकीने आपल्या बाबासाठी जे केलं ते पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.

व्हिडीओत तुम्ही शकता नुकतीच स्वतःच्या पायावर उभी राहून स्वतःच्या पायावर चालायला शिकलेली ही मुलगी. जिचे वडील तिच्यासमोर येतात. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांना नीट चालता येत नाही आहे. कारण त्यांच्या एका पायाला प्लॅस्टर करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांनी चालण्यासाठी काठीचा आधार घेतला. हळूहळू चालत ते आपल्या लाडक्या लेकीजवळ आले. मायलेकीच्या ‘पती स्पेशल’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; एकदा पाहाच हा जबरदस्त VIDEO जसं लेकीने आपल्या बाबांची अवस्था पाहिली तशी ती धावत एका ठिकाणी गेली. तिथून तिने एक खुर्ची ओढली. ही खुर्ची तिने वडिलांना बसायला दिली आणि त्यांच्या हातातली काठी काढून घेऊन ती दुसऱ्या ठिकाणी ठेवली. एवढासा जीव, ज्याला स्वतःचं काय करायचं काय नाही ते कळत नाही. पण बाबाचं दुखणं मात्र ती पाहू शकत नाही. बाबासाठी ती धडपडताना दिसली. या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहे. लिट काइंंड हार्ट, मुलीचा बाप असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो अशा प्रतिक्रिया येत आहेत. एकाने आपल्यालाही मुलगीच हवी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. ‘डॅड ऑफ द इअर’, लेकींच्या सुरक्षेसाठी बाबाने केलं असं काही की तुफान VIRAL होतोय VIDEO @TheFigen_  नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला, तुमची तुमच्या लेकीसोबतची अशी एखादी हृदयस्पर्शी आठवण असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या