नवी दिल्ली, 28 मार्च : आईबाबा आपल्या मुलांसाठी काहीही करू शकतात, हे काही वेगळं सांगायला नको. सामान्यपणे मुलगी आपल्या वडिलांसाठी खूपच खास असते. मुलींना पापा की परीही म्हटलं जातं. अशाच पापा की परी आणि तिच्या पप्पाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका बाबाने आपल्या लेकींच्या सुरक्षेसाठी असं काही केलं की हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
मुली म्हटलं की पालकांना सर्वात जास्त टेन्शन असतं ते तिच्या सुरक्षेचं. बाहेर टपून बसलेले नराधम मुलींसोबत कधी काय करतील सांगू शकत नाही. त्यामुळे मुलींनी सतर्क राहायला हवं. यासाठी पालक मुलींना सुरक्षेचे धडे देतात. या व्हिडीओतील वडीलही आपल्या मुलींना असेच सुरक्षेचे धडे देतो आहे. पण तो ज्या पद्धतीने मुलींना शिकवतो आहे, त्याने सर्वांचं मन जिंकलं आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता या व्यक्तीला तीन मुली आहेत. तिघीही सारख्याच वयाच्या दिसत आहेत. तशा त्या खूपच लहान आहेत. पण याच वयात मुलींना समजत नसतं आणि काही लोक त्यांचा गैरफायदा घेतात. म्हणून तर शाळेतही गूड टच बॅड टच शिकवलं जातं. पण याशिवाय मुलींनी उठताना-बसतानाही काय काळजी घ्यावी हे हा बाबा शिकवतो आहे.
VIDEO - मुलाच्या शाळेत गोळीबाराचं LIVE Reporting करत होती आई; लेकाबाबतच असं काही समजलं की...
तुम्हाला माहिती असेल एखादी वस्तू खाली पडली की उचलण्यासाठी आपण वाकतो. काही वेळा आपल्या शरीराचा जो भाग दिसायला नको, तो आपल्या नकळत दिसतो. आता हे तर या चिमुकल्यांना आपण बोलून समजावू शकत नाही. त्यांना कृतीच करून दाखवावी लागणार. कारण लहान मुलं कृतीचंच अनुकरण करतात. म्हणजे जसं त्यांना दिसतं तसं ते करतात. त्यामुळे या बाबाने ती कृती परफेक्ट व्हावी यासाठी स्वत:ही मुलींचे कपडे घातले आहेत.
3 मुली आणि वडील एकमेकांसमोर उभे आहेत. ती व्यक्ती एक वस्तू जमिनीवर टाकते आणि त्यानंतर कुणीही सामान्यपणे खाली वाकून, बसून ती वस्तू उचलेल अगदी तशीच उचलते. यावेळी ड्रेसखालून सर्वकाही दिसतं. त्यामुळे ती वस्तू उचलून ही व्यक्ती पुन्हा जमिनीवर टाकते आणि आपला ड्रेस पायात जवळ करून मग खाली बसून ती वस्तू उचलायची हे ही व्यक्ती त्या मुलींना दाखवते आणि मुलीही तसंच करतात.
रिअल लाइफ बधाई हो! आईबाबांनी दिली Good news, 23 वर्षांच्या लेकीला वाटली लाज, बाळाचा जन्म होताच...
व्यक्ती त्यांच्या भाषेत त्या मुलींना काय करायचं आणि काय नाही हे सांगते. ती भाषा आपल्याला समजत नसली तर कृती मात्र नक्कीच समजली आहे.
View this post on Instagram
बापलेकीच्या या व्हिडीओने सर्वांचं मन जिंकलं आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. या बाबाचं कौतुक केलं जातं आहे, असे वडील सर्वांकडे असावेत असं काहींनी म्हटलं आहे, तर काहींनी याला डॅड ऑफ द इयर म्हटलं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला? तुम्ही तुमच्या मुलांना असे धडे कशापद्धतीने देता हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Daughter, Father, Parents and child, Small girl, Viral, Viral videos