JOIN US
मराठी बातम्या / Viral / अर्रर्रर्र! AADHAAR च्या फोटोत नको तेच दिसतंय; आता महिलेला कार्ड दाखवायलाही लाज वाटतेय

अर्रर्रर्र! AADHAAR च्या फोटोत नको तेच दिसतंय; आता महिलेला कार्ड दाखवायलाही लाज वाटतेय

आधार कार्डसाठी फोटो काढताना महिलेकडून मोठी चूक झाली. कार्ड मिळाल्यानंतर ही चूक तिच्या लक्षात आली.

जाहिरात

आधार कार्डच्या फोटो मोठी चूक (फोटो - फेसबुक)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 जून : आधार कार्डवरील फोटो कसे असतात ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. फोटोमुळे आधार कार्ड कुणाला दाखवायला तशी लाज वाटतेच. पण एका महिलेच्या फोटोत मात्र असं काही दिसतं आहे की त्यापेक्षा आपल्या आधार कार्डमधील फोटो बरा, असंच तुम्हालाही वाटेल. महिलेने आधार कार्डसाठी फोटो काढताना मोठी चूक केली. पण फोटो काढून कार्ड मिळाल्यानंतर ही चूक तिच्या लक्षात आली. तिचा हा फोटो सोशल मीडियावरही व्हायरल होतो आहे. महिलेने स्वतःच आधार कार्डमधील फोटोच्या चुकीचा हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अंजली उचिहा असं या महिलेचं नाव आहे. ती नोएडामद्ये राहते. तिचं आधार कार्ड इतरांपेक्षा खूप वेगळं आहे. याचं कारण म्हणजे त्यातील फोटो. तिच्या फोटोत असं काही आहे, की तुम्ही विचारही केला नसेल. सांगा पाहू कोण आहे हा प्राणी? योग्य उत्तर देणाऱ्याला मिळणार बक्षीस पोस्टमध्ये महिला म्हणाली, “जेव्हा जेव्हा मला एखाद्या गोष्टीसाठी आधार कार्डाची गरज असते, तेव्हा मला आश्चर्य वाटतं की ज्यादिवशी मी आधार कार्डचं नूतनीकरण करणार होते, तेव्हा मी निष्काळजीपणे एक टी-शर्ट घातला होता, ज्यावर अपशब्द लिहिलेला होता. आता कदाचित यासोबत माझं आयुष्य जाईल’ अंजलीच्या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. ज्यामध्ये समोर ‘F’ ने सुरू होणारा आक्षेपार्ह शब्द लिहिला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या टी-शर्टचा तो भागही फोटोमध्ये कैद झाला. आधारकार्ड हरवलं अन् नंबरही लक्षात नाही? डोंट वरी, घरबसल्या असं मिळवा अंजलीने ते पाहिले तेव्हा तिला लाज वाटली, पण आता तिला आयुष्यभर या टी-शर्टसोबतच जगावे लागेल, असं वाटलं.  पण सुदैवाने आता आधार कार्डवरील फोटोसहित कोणतीही माहिती बदलता येते. त्यामुळे काही युझर्सनी तिला फोटो बदलण्याचा सल्ला दिला आहे. तर एका युझरने आधार कार्डमधील तिचा फोटो इतका गोरा कसा काय, असा मजेशीर सवालही केला आहे. फोटो - फेसबुक

फोटो - फेसबुक

तुमच्या किंवा तुमच्या ओळखीतील व्यक्तीच्या आधार कार्डचा असा काही मजेशीर किस्सा असेल, तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या