नवी दिल्ली, 16 जून : कुत्रा, मांजर, गाय, घोडा असे पाळीव आणि वाघ, सिंह, चित्ता असे काही जंगली प्राणी ही सर्वांना माहिती आहेत. पण जंगलात असे बरेच प्राणी आहेत, ज्यांच्याबाबत सर्वांनाच माहिती नाही. अशाच एका प्राण्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका आयएफएस अधिकाऱ्याने आपल्या सोशल मीडियावर या दुर्मिळ प्राण्याचा फोटो शेअर केला आहे. हा प्राणी कोण ते ओळखण्यास सांगितलं आहे आणि योग्य उत्तर देणाऱ्याला त्यांनी बक्षीसही जारी केलं आहे. भारतीय वन सेवेचे अधिकारी परवीन कासवान यांनी शेअर केलेला हा प्राण्याचा फोटो. जो तुम्ही पाहिला तर कन्फ्युझ व्हाल. कधी या प्राण्याला मांजर म्हणाल कर कधी चित्ता. परवीन कासवान यांनी या प्राण्याची थोडक्यात ओळखही आपल्या ट्विटमध्ये दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार भारतात आढळणाऱ्या सर्वात सुंदर जंगली मांजरींपैकी हे एक आहे. फारच क्वचित दिसणारे आणि फार कमी ओळखीचं. त्याच्या चेहऱ्यावर एक पांढरी खूण आहे, ज्यावरून तुम्ही ते सहज ओळखू शकता. साध्याभोळ्या गायीने उधळून लावला खतरनाक किंग कोब्राचा डाव; गोठ्यात येताच काय केलं पाहा VIRAL VIDEO तुम्हाला त्याचे नाव माहित आहे का?, असं विचारत त्यांनी योग्य उत्तर देणाऱ्या पहिल्या व्यक्तीला बक्षीस देण्याचं जारी केलं आहे. त्यांनी या प्राण्याला सर्वात आधी ओळखणाऱ्याला, त्याचं नाव सांगणाऱ्याला भेटवस्तू म्हणून आपल्याकडून पुस्तक देणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटिझन्समध्ये जणू या प्राण्याला ओळखण्याची, त्याचं नाव सांगण्याची स्पर्धाच झाली आहे. प्रत्येकाने त्याची वेगवेगळी नावं सांगितली आहेत. बहुतेकांनीहा एशियन गोल्डन कॅट असल्याचं म्हटलं आहे. बंगालमध्ये याला कॅटोपुमा टेम्मिंकी या नावानं ओळखलं जातं. VIDEO - जंगलातील झाडात लपून फोटोग्राफर बनवत होता व्हिडीओ; इतक्यात बिबट्याची नजर पडली अन्… काही महिन्यांपूर्वी बंगालमध्ये ते दिसलं होतं. बक्सा व्याघ्र प्रकल्पाच्या वन अधिकाऱ्यांनी उत्तर बंगालमध्ये दुर्मिळ आशियाई सोनेरी मांजर पाहिली. लुप्तप्राय प्राण्यांच्या विशेष यादीमध्ये सूचीबद्ध केलेल्या अनेक प्रजातींपैकी ही एक आहे. मुळात हे मध्यम आकाराचे रान मांजर चीन आणि भारताच्या सीमेला लागून असलेल्या जंगलात आढळतं. मात्र त्यांची संख्या खूपच कमी आहे.
One of the most beautiful wild cat species found in India. Very less known & less seen. Can be identified easily with the white markings on the face. The first right answer will get a book from me. pic.twitter.com/EPDwoQyJnP
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) June 16, 2023
भारतात आता हे प्राणी डझनपेक्षा कमी प्रमाणात असल्याचं सांगितलं जातं. नर मांजरी सहसा मादी मांजरींना मारतात, ज्यामुळे ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.