जाहिरात
मराठी बातम्या / मनी / आधारकार्ड हरवलं अन् नंबरही लक्षात नाही? डोंट वरी, घरबसल्या असं मिळवा

आधारकार्ड हरवलं अन् नंबरही लक्षात नाही? डोंट वरी, घरबसल्या असं मिळवा

आधार कार्ड

आधार कार्ड

आधार कार्ड तयार करताना तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीही रजिस्टर केला जातो. असा वेळी मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडीच्या माध्यमातून आधार नंबर माहिती करता येतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 मे : आधार कार्ड हा एक महत्त्वाचा डॉक्यूमेंट आहे. हा आपल्या ओळखीचा एक ठोस पुरावा बनला आहे. याशिवाय, आधार कार्ड आता तुमचे रेशन कार्ड, पॅन कार्ड आणि इतर काही कागदपत्रे यासोबतच बँक अकाउंटसोबत लिंक करणे देखील अनिवार्य झालंय. एकूणच सध्याच्या काळात आधारकार्ड शिवाय राहणं आता अशक्य आहे. UIDAI सेल्फ सर्व्हिस पोर्टल हे एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे जे तुम्हाला तुमचा आधार नंबर पुन्हा प्राप्त करण्यास आणि तुमच्या आधार कार्डची प्रत डाउनलोड करण्याची सुविधा देते.

News18लोकमत
News18लोकमत

तुमचं आधार कार्ड हरवलं तर काळजी करण्याची गरज नाही, UIDAI आधार हरवल्यास ते पुन्हा तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून देते. UIDAI सेल्फ सर्व्हिस पोर्टल हे एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. जे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक पुन्हा मिळवण्याची आणि तुमच्या आधार कार्डची प्रत डाउनलोड करण्यास सुविधा देते. आधार कार्ड तयार करताना तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीही रजिस्टर केला जातो. अशा वेळी, तुम्ही तुमचा आधार नंबर मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आयडीद्वारे शोधू शकता.

आजोबा आणि वडिलांच्या संपत्तीवर लोन घेता येतं का? काय सांगतो नियम?

आधार क्रमांक मिळविण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

- UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जा. - आधार नंबर (UID) किंवा एनरोलमेंट नंबर(EID) चा पर्याय निवडा. - यानंतर नाव, ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर टाका. - आता सिक्युरिटी कोड टाईप करा. त्यानंतर Send OTP वर क्लिक करा. - तुमच्या रजिस्टर ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल. - OTP टाका आणि ‘लॉग इन’ बटणावर क्लिक करा. - यानंतर तुमचा आधार नंबर तुमच्या रजिस्टर ईमेल पत्त्यावर किंवा मोबाईल नंबरवर पाठवला जाईल. तुमचे आधार कार्ड पुन्हा मिळवण्यासाठी तुम्ही 1800-180-1947 (टोल-फ्री) किंवा 011-1947 (स्थानिक) वर कॉल करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात