JOIN US
मराठी बातम्या / Viral / नीट पाहा हा PHOTO, सोशल मीडियावर तुफान होतोय VIRAL; काय आहे कारण Watch Video

नीट पाहा हा PHOTO, सोशल मीडियावर तुफान होतोय VIRAL; काय आहे कारण Watch Video

फोटोत असलेल्या या महिलेचं सत्य भलतंच आहे, ज्यावर तुम्हाला विश्वासच बसणार नाही.

जाहिरात

महिलेच्या फोटोने वेधलं लक्ष

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

तिरुवनंतपुरम, 28 मार्च : हा फोटो नीट पाहा. यात तुम्हाला कोण दिसते आहे? साहजिकच तुम्ही म्हणाल महिला . साडी नेसलेली, कुरळे केस मोकळे सोडलेली,  कानात झुमके, डोक्यावर टिकली, चमकदार चेहरा आणि त्या चेहऱ्यावर गोड हसू. सुंदर अशी ही महिला, जिला पाहताच काही जण तिच्या प्रेमातही पडले असतील. या महिलेचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामागील कारणही खास आहे. या फोटोतील महिलेचं सत्य समजल्यानंतर तुम्हालाही यावर विश्वास बसणार नाही. आयआरएएस ऑफिसर अनंत रूपनागुडी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. ज्यात या महिलेचा फोटो आहे. फोटोतील ही महिला का चर्चेत आली असावी असं तुम्हाला वाटतं. कोण आहे ही महिला, का आली चर्चेत, काय आहे तिचं सत्य? याबाबत तुम्ही काही अंदाज लावू शकता का? तुम्हाला काही माहिती आहे का? डोक्याला थोडा जोर लावून बघा, तुम्हाला जमतंय का? Shocking! फूलझाडांचं ‘डर्टी सिक्रेट’; CCTV पाहताच मालक हादरला रूपनागुडी यांनी ट्विटर पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, केरळमधील एका उत्सवातील हा फोटो आहे. कोल्लम जिल्ह्यातील कोट्टमकुलकारा परिसरातील देवीचं एक मंदिर आहे. जिथं मयाविलक्कू उत्सव असतो. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार आणि केरळ टुरिझ्मच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार केरळमधील हा सण दिव्यांचा सण असतो. मल्याळम महिना मीनमच्या दहाव्या आणि अकराव्या दिवशी म्हणजे मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात हा उत्सव असतो.

या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे यात पुरुष महिला बनतात. म्हणजे पुरुष महिलांसारखे तयार होतात आणि या उत्सवात सहभाही होतात. पुरुष महिलांसारखे दागिने-ड्रेस घालून, मेकअप करून नटूनथटून मशाल, दिवे घेऊन येतात. बॉसने ऑफिसमध्ये वाटली मिठाई, खाताच कर्मचाऱ्याला धक्का; एका रात्रीत ती प्रेग्नंट या फोटोत दिसणारी महिलाही महिला नाही तर पुरुष आहे, जी या उत्सवात सहभागी झाला. या उत्सवात त्याला पहिला पुरस्कार मिळाला. हा त्याच दिवसाचा फोटो आहे.

संबंधित बातम्या

या उत्सवात समलैंगिक लोकही या उत्सवात सहभागी होतात कारण हाच एक उत्सव असा आहे, ज्यात ते त्यांचं सत्य, खऱं आयुष्य मोकळेपणाने जगतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या