मराठी बातम्या /बातम्या /Viral /बॉसने ऑफिसमध्ये वाटली मिठाई, खाताच कर्मचाऱ्याला धक्का; एका रात्रीत ती प्रेग्नंट

बॉसने ऑफिसमध्ये वाटली मिठाई, खाताच कर्मचाऱ्याला धक्का; एका रात्रीत ती प्रेग्नंट

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

बॉसने गूड न्यूज म्हणून कर्मचाऱ्यांना मिठाई वाटली आणि त्यानंतर कर्मचाऱ्याला असं काही समजलं की त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

लंडन, 28 मार्च :  कंपनीला फायदा झालेला असेल, बॉसच्या घरात एखादा कार्यक्रम असेल किंवा काही आनंदाची बातमी असेल तर बरेच बॉस उत्साहाने कंपनीतील कर्मचाऱ्यांनाही या आनंदात सहभागी करून घेतात. काही बॉस कर्मचाऱ्यांना बोनस देतात, काही पार्टी देतात तर काही मिठाई वाटतात. अशाच एका बॉसने गूड न्यूज म्हणून आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना मिठाई वाटली. ही मिठाई खाल्ल्यानंतर एका कर्मचाऱ्याला धक्काच बसला. एका रात्रीतच प्रेग्नंट झाल्याची बातमी मिळाली.

या व्यक्तीने द सन या वेबसाईटच्या एका सेक्शनवर ही संपूर्ण घटना शेअर केली आहे. या व्यक्तीने वेबसाईटला पत्र लिहिलं आणि आपली समस्या मांडत त्यावर सल्ला मागितला आहे. या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, ती  मॅकेनिक आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो आपल्या मित्राच्या वडिलांसोबत काम करत होता. त्यामुळे तो आपल्या बॉस आणि त्यांच्या कुटुंबाच्या खूपच जवळ होता.

बॉसच्या घरात लग्न होतं, त्यावेळी ही व्यक्तीही त्या लग्नाला गेली होती. तिथंच तो बॉसच्या मुलीला भेटला. तिचं लग्न झालेलं होतं. पण तिचा नवरा तिच्यासोबत राहत नव्हता. कामानिमित्त तो बाहेरच असायचा. त्यामुळे या लग्नात तशी ती एकटीच होती. त्यामुळे ही व्यक्ती पूर्ण वेळ बॉसच्या मुलीसोबतच होती. यादरम्यान त्यांच्यात जवळीक वाढली. ते लोक इतके जवळ आले की एका खोलीत जाऊन त्यांनी शारीरिक संबंधही ठेवले. पण त्यानंतर तो क्षण विसरण्याचं त्यांनी ठरवलं. त्यानंतर ते एकमेकांना एकदाही भेटले नाहीत.

हॉस्पिटलऐवजी घरीच केली डिलीव्हरी; जन्माला आलं असं बाळ जे आजवर कधीच पाहिलं नाही

यानंतर काही दिवसांतच व्यक्तीच्या बॉसने ऑफिसमध्ये मिठाई वाटली. आपण आजोबा होणार असल्याची गूड न्यूज त्याने दिली. त्यावेळी व्यक्तीला धक्का बसला. कारण हे मूल आपलंच असावं असं त्याला वाटत होतं. त्या बाळाला भेटण्याची, त्याला आपल्या मिठीत घेण्याची इच्छा त्याची होती.  त्यामुळे त्याने बॉसच्या मुलीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण ती त्याचा फोन उचलत नाही आहे. आता आपण काय करायला हवं, असा सल्ला या व्यक्ती वेबसाईटला दिलेल्या पत्रात मागितला.

वेबसाईटने या व्यक्तीला सर्वकाही विसरण्याचा सल्ला दिला आहे. कदाचित ते मूल त्याच्या बॉसच्या मुलीच्या नवऱ्याचंच असावं कारण तो मध्ये मध्ये येत होता. आणि जरी हे मूल त्या व्यक्तीचं असलं तरी त्याने त्या महिलेला तो तिला मानसिक आणि आर्थिक मदतीसाठी तिच्यासोबत आहे, असा मेसेज तिला करावा. याशिवाय त्याने दुसरं काहीच करू नये, असं सांगितलं आहे.

अग्गं बाई! लेकीसह आई, सासू, आजीही प्रेग्नंट; एकाच वेळी 3 पिढ्यांच्या प्रेग्नन्सीचे PHOTO तुफान VIRAL

तुम्हाला काय वाटतं, या व्यक्तीने काय करायला हवं? यावर तुमचं मत काय? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

First published:
top videos

    Tags: Pregnancy, Pregnant, Viral