लंडन, 28 मार्च : झाडं सजीव असतात. त्यांना अन्नपाणी, ऊन-हवा लागते. पण इतर सजीवांप्रमाणे ते एका जागेवरून दुसऱ्या जागी हलत नाहीत किंवा अशा बऱ्याच क्रिया आहेत, जे ते करू शकत नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे पॉटी. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल. एका फुलझाड, ज्यात फुलांऐवजी रोज पॉटी दिसत होती. झाडातील ही पॉटी नेमकी येत तरी कुठून होती म्हणून मालकाने सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि फुलझाडाचं सत्य समजताच तोही शॉक झाला.
यूकेच्या लिंकनमधील सेंट पीटर एट आर्चेसमधील ही घटना. इथल्या स्नूकर क्लबबाहेर फुलांची कुंडी होती. क्लबच्या मालकाला जाणवलं की बऱ्याच दिवसांपासून फुलांच्या कुड्यांमधून विचित्र घाणेरडा वास येत होता. जेव्हा त्याने जवळ जाऊन पाहिलं तेव्हा त्याला धक्काच बसला. कारण त्या फुलांच्या कुंडीत पॉटी होती. हे घाणेरडं कृत्य केलं कोणी हे पाहण्यासाठी त्याने सीसीटीव्ही फुटेज पाहिलं तेव्हा धक्कादायक सत्य त्याच्यासमोर आलं.
जिथं पाय ठेवला तिथं हिरवळ; 'पीपल बाबा'मुळे उगवली तब्बल 2 कोटी झाडं
सीसीटीव्हीमध्ये 22 मार्चला एक व्यक्ती सकाळी सहाच्या सुमारास क्लबबाहेर फिरताना दिसली. त्या व्यक्तीने आधी इकडे तिकडे पाहिलं. आपल्याजवळ कुणी नाही, आपल्याला कुणी पाहत नाही याचा अंदाजा घेत तिने आपल्या पँटचा बेल्ट काढला, पँट खाली केली आणि फुलझाडांच्या कुंडीजवळ बसला, त्यात त्याने पॉटी केली. त्यानंतर त्याने आपल्या वॉलेटमधून टिश्यू काढला. आपला मागील भाग टिश्यूने पुसला आणि तिथून आरामात निघून केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
क्लबच्या मालकाने सांगितलं की त्याला गेल्या काही दिवसांपासून दररोज या कुंडीतून वास येत होता. ही व्यक्ती बऱ्याच कालावधीपासून असं करत होती, ज्याचा खुलासा आता झाला. या व्यक्तीला दिवसाढवळ्या कुणाचंही घर, ऑफिस किंवा मॉलबाहेरील कुंडीत पॉटी करण्याची विचित्र सवय होती.
काय सांगता! एकाच झाडावर 300 प्रकारचे आंबे; भारतातच आहे हे झाड, पण कुठे ते माहितीये का?
क्लबच्या मालकाने हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले आहेत. पण पोलिसांनी क्लबच्या मालकालाच याची साफसफाई करण्याचं काम दिलं आहे पोलिसांनी सांगितलं की, ही अस्वच्छता त्याच्या खासगी संपत्तीवर आहे, त्यामुळे त्यालाच ही सफाई करावी लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tree, Viral, Viral news, Viral videos