viral video
मुंबई, 21 जून : सोशल मीडियावर स्टंट संबंधीत अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असेल. आजकालची तरुण मंडळी ही कशाचाही विचार न करता फक्त आणि फक्त प्रसिद्धीसाठी वाट्टेल ते करण्याची तयारी दाखवतात. ज्यामुळे कधी कधी त्यांच्या जीवाला ही धोका असू शकतो. परंतू या सगळ्या गोष्टींचा ते विचार करत नाहीत. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एका कपलचा आहे. रात्रीच्या वेळी हायवेवर हे कपल स्टंटबाजी करताना दिसले. तेव्हा एका कारमधील व्यक्तीने हे संपूर्ण प्रकरण आपल्या फोनमध्ये कैद केलं आहे. हा व्हिडीओ दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवरील असल्याचे या व्हिडीओमध्ये सांगितले जात आहे. या हायवेवर ताशी 100 किलोमीटर वेगाने वाहने धावतात आणि तिथे स्टंटबाजी करणेही अत्यंत धोकादायक ठरू शकते. परंतू हे कपल कशाचाही विचार करत नाही. 9 सेकंदात मृत्यूचा तांडव, बाईक स्टंट करताना एक चुक आणि… पाहा Video एकतर या व्हिडीओत हे स्पष्ट दिसत आहे की दुचाकी चालकाने ट्राफिकचा एक नियम मोडला आहे, ज्यामध्ये त्याने हेल्मेट घातलेले नाही. शिवाय या तरुणासमोर त्याची गर्लफ्रेंड बसली आहे. ती त्या तरुणाकडे तोंड करुन बसली आहे. व्हिडीओत हे स्पष्ट दिसत आहे की दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आहे.
100 च्या स्पीडने गाडी चालवताना हे कपल रोमान्स करत आहे. हा खूपच धोकादायक स्टंट आहे कारण यामुळे त्या दोघांनाही दुखापत होऊ शकते शिवाय इतर गाड्यांना देखील नुकसान पोहोचेल. यामध्ये कोणाचेही प्राण देखील जाऊ शकतात. दारुच्या नशेत व्यक्तीचा धोकादायक स्टंट, झाडावर चढला आणि… Video Viral मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडीओ 20 जून म्हणजेच मंगळवारी रात्री 12.30 च्या सुमारास आहे. हा व्हिडीओ टूर अँड ट्रॅव्हल्स ऑपरेटर सुधांशू यांनी इंदिरापुरमजवळ त्याच्या मोबाईलवरून शूट केला आहे, जे त्यावेळी कारने गाझियाबाद येथील आपल्या घरी परतत होते. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरुम कमेंट्स केल्या आहेत आणि कपलच्या अशा वागण्याला ट्रोल केलं आहे. शिवाय त्यांच्यावर कारवाई करण्याची देखील मागणी केली आहे.