मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. काही लोक येथे प्रसिद्धीसाठी काहीही करण्याची तयारी दाखवतात. तर काही लोक आपल्या जीवाची बाजी लावत असल्याचे पाहायला मिळतात. बऱ्याचदा लोक हे व्हिडीओसाठी करतात. पण काहीवेळेला लोक मित्रांसमोर आपण किती साहसी आहोत हे दाखवण्यासाठी विचित्र गोष्टी करत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल. हा एक स्टंट व्हिडीओ आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती दारुच्या नशेत आपल्या जीवाशी खेळत असल्याचे पाहायला मिळत आहे. घराच्या बाहेर दररोज यायचा विचित्र वास, CCTV तपासताच समोर आलं धक्कादायक सत्य सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती समोरच्या झाडावर चढू लागते. कसातरी करत ती झाडाच्या वरच्या टोकाला पोहोचती. ती व्यक्ती इथेच थांबत नाही तर, आता ती आपला स्टंट दाखवू लागले. ही व्यक्ती झाडाच्या एका लवचिक फांदीवर उभी राहाते आणि ती फांदी जोरजोरात हलवू लागते. काहीवेळा नंतर ही व्यक्ती आपली एक चप्पल खाली फेकते आणि झाडाच्या फांदीला उलटी लटकू लागते आणि हा व्हिडीओ इथेच थांबतो.
*#होलिकोत्सव की #बधाई, रुझान आना शुरू हो गए हैं* 🤣🤣 pic.twitter.com/bKn09oDGnv
— Mahendra(Buddhay-sanatanayप्रचारक संस्कृतम्) (@M4_VED) March 7, 2023
या व्हिडीओत पुढे काय घडलं, ही व्यक्ती सेफ आहे की नाही हे काही कळू शकलेलं नाही, पण हा व्हिडीओ होळीच्या काळातील असल्याचं म्हटलं जात आहे.
@M4_VED नावाच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदांच्या या व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच लोकांनी यावर भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.