जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 9 सेकंदात मृत्यूचा तांडव, बाईक स्टंट करताना एक चुक आणि... पाहा Video

9 सेकंदात मृत्यूचा तांडव, बाईक स्टंट करताना एक चुक आणि... पाहा Video

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

हे स्टंट अनेकांच्या अंगाशी आले आहेत. ज्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर काही लोक गंभीर जखमी देखील झाले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. येथे धोकादायक स्टंटपासून ते मनोरंजक गोष्टीपर्यंत अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण सध्या समोर आलेला व्हिडीओ हा हृदयाचा ठोका चुकवणारा आहे. हा व्हिडीओ बाईक स्टंटच आहे. ज्यामध्ये स्टंट करत असताना या तरुणाचा थरारक असा अपघात घडला आहे. बॉलीवूड किंवा हॉलिवूड चित्रपटांमध्ये स्टंट तुम्ही पाहिले असतील, पण हे स्टंट नेहमीच देखरेखीखाली केले जातात. कोणाला काही होणार नाही याची देखील काळजी घेतली जाते. पण या सगळ्याचा विचार न करता काही तरुण मंडळी प्रसिद्धसाठी स्टंट करतात. हे स्टंट अनेकांच्या अंगाशी आले आहेत. ज्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर काही लोक गंभीर जखमी देखील झाले आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

या व्हायरल व्हिडीओमध्ये देखील असंच पाहायला मिळालं. 9 सेकंदाच्या व्हिडीओ क्लिपमध्ये तुम्हाला मृत्यूचा तांडव दिसेल, जो पाहून तुमचा आत्मा हादरेल. हा व्हिडीओ बिफोर डेथ नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक व्यक्ती अतिशय वेगात बाईक चालवताना दिसत आहे. दरम्यान, त्याची बाईक दगडावर आदळते आणि एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे ही हवेत उडताना तुम्ही पाहू शकता, शिवाय बाईकही हवेत उडताना दिसते. म्हशीला लाथ मारताच तरुणांसोबत घडला असा प्रकार, आता Video ठरतोय चर्चेचा विषय हा व्हिडीओ इथेच थांबतो, त्यामुळे पुढे या तरुणाचं काय होतं, हे कळू शकलेलं नाही. परंतु असं म्हटलं जात आहे की त्याचा मृत्यू झाला आहे. बाईकवर स्टंट करणाऱ्या या व्यक्तीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि आत्तापर्यंत हजारो लोकांनी तो पाहिला आहे. त्याचवेळी, ही व्यक्ती आता वाचणार नाही, अशी टिप्पणी नेटिझन्स करत आहेत.

जाहिरात

मात्र, बाईकवर कोणीतरी अशा प्रकारे स्टंट करताना दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ ट्रेंड झाले आहेत. पण या सगळ्या व्हिडीओपैकी हा एक सर्वात खतरनाक आणि हदरवणारा व्हिडीओ आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात