JOIN US
मराठी बातम्या / Viral / Social media वरील Like मुळे Life ची वाट! तरुणासोबत भयंकर घडलं; पाहा VIDEO

Social media वरील Like मुळे Life ची वाट! तरुणासोबत भयंकर घडलं; पाहा VIDEO

सोशल मीडियावर जास्तीत जास्त लाइक मिळवण्याच्या नादात तरुणाने स्वतःच्या जीवाशी खेळ केला.

जाहिरात

सोशल मीडियाच्या नादात जीवाशी खेळ.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सय्यद कयम रजा/लखनऊ, 11 मार्च : हल्ली प्रत्येकाला सोशल मीडिया चं वेड लागलं आहे. फेमस होण्याचा हा सहजसोपा असा मार्ग. पण सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणंही वाटतं तितकं सोपं नाही. त्यामुळे प्रत्येकाचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी, आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी, आपल्या पोस्टला जास्तीत जास्त लाइक मिळवण्यासाठी, त्या जास्तीत जास्त शेअर व्हाव्यात यासाठी कित्येक लोक काय काय नाही करत. काही जण काहीतरी हटके करतात, तर काही जण अगदी आपला जीव धोक्यात घालायलाही मागेपुढे पाहत नाही. सोशल मीडियावर अशाच लाइक मिळवण्याच्या नादात एका तरुणाच्या लाइफची वाट लागली आहे. उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमधील ही प्रकरण आहे. घुंघचाईमध्ये राहणारा दीपक जोशी नावाचा हा तरुण. सोशल मीडियावर रिल बनवण्याची हौस त्याला होती. आपले वेगवेगळे रिल्स तो इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर पोस्ट करायचा. आपल्या पोस्टला जास्तीत जास्त लाइक मिळण्यासाठी तो काही ना काही तरी नवीन करायचा. असाच एकदा त्याने लाइकसाठी स्वतःच्याच लाइफसोबत नको तो खेळ केला. सोशल मीडियावर रिल्ससाठी त्याने एक जीवघेणा स्टंट केला. या स्टंटच्या प्रयत्नात हा तरुण पेटला. तो मृत्यूच्या दारातच गेला होता. पण सुदैवाने त्याचा ीव वाचला. मेडिकल टेस्ट करताना एक चूक, व्यक्तीचा धक्कादायक मृत्यू; तुम्हीही असं करत नाहीत ना? दीपकने जत्रा आणि सर्कसमध्ये दाखवले जाणारे आगीचा स्टंट करत होता. त्याने आपल्या तोंडात केरोसिन भरलं आणि आग लावली. या आगीमुळे त्याचा चेहरा पेटला.

एक तरुण दीपकचा व्हिडीओ शूट करत होता. तोसुद्धा घाबरला. त्याने घाईघाईत कसंबसं करून दीपकच्या चेहऱ्याला लागलेली आग विझवली आणि त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. त्याच्यावर उपचार करून त्याला आता घरी पाठवण्यात आलं आहे. त्याचा व्हिडीओही समोर आला आहे. आयला! तरुणाच्या पोटात दारूची बाटली, डॉक्टरही चक्रावले; पण आत गेली तरी कशी? व्हिडीओत तुम्ही पाहू शकता दीपकच्या चेहऱ्याची काय अवस्था झाली आहे. पाहूनच तुमच्या अंगावर काटा येईल.

जे दीपकसोबत घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं. त्यामुळे सोशल मीडियावर जास्त प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात असे जीवघेणे स्टंट करू नका, इतकंच तुम्हाला आवाहन.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या