जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / मेडिकल टेस्ट करताना एक चूक, व्यक्तीचा धक्कादायक मृत्यू; तुम्हीही असं करत नाहीत ना?

मेडिकल टेस्ट करताना एक चूक, व्यक्तीचा धक्कादायक मृत्यू; तुम्हीही असं करत नाहीत ना?

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

मेडिकल टेस्टआधी डॉक्टरांनी सांगितलेलं त्याने ऐकलं नाही आणि तेच त्याच्या जीवावर बेतलं.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

ब्राझिलिया, 11 फेब्रुवारी : मेडिकल टेस्ट करायला जातो तेव्हा आपल्याला बरीच काळजी घ्यावी लागते. मशीनमार्फत चेकींग होणार असाल तर जरा जास्तच सावध राहावं लागू शकतो. थोडासा निष्काळजीपणा किंवा चूकही आपल्या जीवावर बेतू शकते. असंच एक धक्कादायक प्रकरण सध्या समोर आलं आहे. एमआरआय करायला गेलेल्या एका व्यक्तीने अशी चूक केली ज्यामुळे त्याचा धक्कादायक मृत्यू झाला आहे. ब्राझीलमधील ही घटना आहे. कोणतीही वैद्यकीय चाचणी करताना डॉक्टर आपल्याला काय करायचं आणि काय नाही हे सांगतात. पण काही लोक त्याला फार गांभीर्याने घेत नाहीत. किंवा त्याकडे दुर्लक्षच करतात. डॉक्टर उगाचच काहीही सांगतात, काही होणार नाही, असंच अनेकांना वाटतं. पण असाच अॅटीट्युट एका वकिलाच्या जीवावर बेतला. लिएंड्रो मॅथियास डी नोव्हस असं त्याचं नाव. जीव वाचवणाऱ्या मशीननेच त्याचा जीव घेतला आहे आणि यामागे त्याचीच चूक कारणीभूत होती. हे वाचा -  सैनिकाच्या छातीत हृदयाजवळच अडकला जिवंत बॉम्ब; सर्जरी करून डॉक्टर काढायला गेले आणि… साओ पाओलातील एका रुग्णालयात एमआरआय करत होता. सामान्यपणे एमआरआय करताना सर्व धातूच्या वस्तू बाहेर काढून ठेवायला सांगितला जात्यात. पण नोव्हसने इतर वस्तू बाहेर काढल्या पण त्याच्या कमेरला असलेली बंदूक त्याने तशीच ठेवली. याबाबत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही माहिती नव्हतं.

News18लोकमत
News18लोकमत

मशीन चालू करताच नोव्हसच्या कमरेला बांधलेली असलेली ही बंदूक मशीनकडे ओढली जावू लागली. कारण  एमआरआय मशीन एक शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र तयार करते. ही चुंबकीय ऊर्जा कोणतीही लोखंडी वस्तू स्वतःकडे खेचून घेते. याच चुंबकीय ऊर्जेमुळे नोव्हसच्या बंदूक खेचली गेली. त्याच वेळी बंदुकीतून गोळी सुटली आणि ती नोव्हसच्या पोटात घुसली. त्यानंतर बंदूक बाहेर पडून मशीनला चिकटली. हे वाचा -  तब्बल 77 वर्षे मानेतच अडकलाय ‘मृत्यू’; मेडिकल रिपोर्ट पाहून डॉक्टर शॉक, ऑपरेशनलाही नकार गंभीर जखमी झालेल्या नोव्हसवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. आठवडाभर तो जीवनमृत्यूशी झुंज देत होता. अखेर त्याची झुंज अपयशी ठरली. तीन दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात