JOIN US
मराठी बातम्या / Viral / व्यक्तीने पाण्यात डुबकी मारली आणि समोर महाकाय अ‍ॅनाकोंडा; पुढचा थरार VIDEO मध्येच पाहा

व्यक्तीने पाण्यात डुबकी मारली आणि समोर महाकाय अ‍ॅनाकोंडा; पुढचा थरार VIDEO मध्येच पाहा

पाण्यात गेलेल्या माणसाचा सामना खतरनाक अ‍ॅनाकोंडाशी झाला. हा धडकी भरवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जाहिरात

माणसासमोर आला अ‍ॅनाकोंडा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 28 एप्रिल : अ‍ॅनाकोंडा फिल्म तर तुम्ही सर्वांनी पाहिलीच असेल. या फिल्ममधील महाकाय अजगर पाहूनच धडकी भरते. विचार करा असा अजगर प्रत्यक्षात तुमच्यासमोर आला तर… फक्त कल्पनेनेच घाम फुटला ना? पण एका व्यक्तीचा अशाच खतरनाक अवाढव्य अ‍ॅनाकोंडाशी सामना झाला. या व्यक्तीने पाण्यात उडी मारली आणि त्याच्यासमोर होता तो भलामोठा अ‍ॅनाकोंडा. हा भयंकर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. जगात असे अनेक प्राणी आहेत ज्यांची गणना पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वात धोकादायक प्राण्यांमध्ये केली जाते. यामध्ये केवळ सिंह, वाघ नव्हे तर मगर, साप अशा प्राण्यांचाही समावेश आहे. फक्त सापांबद्दल म्हणाल तर काही साप विषारी नसतात पण ते धोकादायक नक्कीच असतात.  यात अ‍ॅनाकोंडाचा समावेश आहे . अ‍ॅनाकोंडा हा जगातील सर्वात मोठा आणि वजनदार साप असल्याचं म्हटलं जातं. जिथे सामान्यत: लहानसा साप पाहिला तरी माणसांची अवस्था बिकट होते, अशा परिस्थितीत अचानक एखादा अ‍ॅनाकोंडा तुमच्या समोर आला तर काय होईल?

एका व्यक्तीने याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. ही व्यक्ती पाण्यात गेली आणि तिच्यासमोर अचानक तिला भलामोठा अ‍ॅनाकोंडा दिसला. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातीला अ‍ॅनाकोंडाची शेपटी दिसते. त्यानंतर हळूहळू कॅमेरा पुढे जातो. अ‍ॅनाकोंडाचा आकार पाहूनच आपल्या हृदयाची धडधड वाढते. हळूहळू कॅमेरा अ‍ॅनाकोंडाच्या तोंडाजवळ जातो. साधा साप समजून तरुणाने शेपटी खेचली आणि…, धक्कादायक शेवट; Shocking Video त्याच्यासमोर एक माणूस दिसतो आहे. तो अ‍ॅनाकोंडाच्या इतका जवळ आहे की आता याचं काही खरं नाही, असा विचार करून आपल्यालाच घाम फुटतो. अ‍ॅनाकोंडाचं तोंड दुसऱ्या दिशेला आहे. जसा माणूस त्याच्या जवळ येतो तसा तो आपलं तोंड त्या माणसाकडे फिरवतो. माणूस आणि अ‍ॅनाकोंडाचा सामना होतो.  दोघंही एकमेकांकडे काही वेळ बघत राहतात. पण पुढे जे घडलं ते आश्चर्यचकीत करणारं आहे. अ‍ॅनाकोंडा त्या व्यक्तीला काहीच करत नाही. उलट तो तिथून शांतपणे निघून जातो. @thatsinsane__ नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ब्राझीलमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. OMG! वेदना होऊन सूजलं हाताचं बोटं, पाहिलं तेव्हा त्यात सापाचं…; व्यक्तीही शॉक अ‍ॅनाकोंडाचं वागणं पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. कदाचित हा धोकादायक अ‍ॅनाकोंडा नसावा म्हणून माणसाला पाहिल्यानंतरही तो तिथून निघून गेला, अशी कमेंट एका युझरने केली आहे.

संबंधित बातम्या

तुम्हाला काय वाटतं, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या