जाहिरात
मराठी बातम्या / Viral / साधा साप समजून तरुणाने शेपटी खेचली आणि..., धक्कादायक शेवट; Shocking Video

साधा साप समजून तरुणाने शेपटी खेचली आणि..., धक्कादायक शेवट; Shocking Video

सापाचा व्हिडीओ

सापाचा व्हिडीओ

सापाची शेपटी त्याने धरली आणि पुढे जे घडलं ते पाहून हादराल.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 27 एप्रिल : समोर साप  दिसला तरी आपल्याला घाम फुटतो. काही लोक साप पकडण्यात तरबेज असतात. साप म्हणजे काहीच नाही असं त्यांना वाटतं. त्यामुळे अगदी एखादी दोरी पकडावी तसे ते हातात सापाला पकडतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात छोटासा साप समजून एका तरुणाने त्याची शेपटी खेचली पण त्याच्यासमोर जे आलं ते पाहून त्याला घाम फुटला. सर्पमित्र असलेला एक तरुण साप पकडण्यासाठी पोहोचला. दरवाजाजवळ या सापाची शेपटी होती. त्याने शेपटीला धरलं आणि सापाला खेचलं. जशी त्याने सापाची शेपटी खेचली तसा त्याला धक्काच बसला.

News18लोकमत
News18लोकमत

ज्या सापाला हा तरुण छोटासा समजत होता तो चक्क किंग कोब्रा होता. जशी त्याने त्याची शेपटी खेचली आणि त्याला ओढलं. तसा हा किंग कोब्रा त्याच्या समोर अचानक आला आणि फणा काढून उभा राहिला. OMG! दारू पोटात जाताच तरुणाच्या शरीरातून बाहेर आला ‘नाग’; पाहा VIDEO जसा कोब्रा दिसला तसा तरुणसुद्धा घाबरला. त्याला घामच फुटला. जी काठी सापाला पकडण्यासाठी त्याने आपल्या हातात घेतली होती तीसुद्धा भीतीने फेकून दिली आणि तो मागेच हटला. आपली शेपटी दुमडून फक्त फणा काढून  जवळपास या व्यक्तीच्या उंचीइतकाच तो दिसत होता. @thatsinsane__ ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून सर्वांना धडकी भरली आहे.

जाहिरात

तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. किंग कोब्राबाबत माहिती कोब्रा हा भारतातील पूर्व व दक्षिण भागात आढळणारा दुर्मिळ साप आहे. हा नावाप्रमाणेच नागराज आहे. विषारी सापांमध्ये लांबीला सर्वाधिक आणि विषाच्या प्रभावात नागापेक्षा कमी मात्रा मोठी असल्याने फार धोकादायक. याचे विषाने माणूस अर्ध्या तासाच्या आत मरू शकतो. जेवण बनवत असताना अचानक समोर नाग आला, पुढे घडलं ते भयानक VIRAL VIDEO अंड्यातून नुकतीच बाहेर आलेली पिल्ले जवळपास 1 ते 2 फूट लांबीची तर पूर्ण वाढलेला नागराज सरासरी 10 ते 15 फूट लांबीचा असतो. याचा रंग गडद हिरवट,राखाडी,पिवळट तपकिरी असून शरीरावर पिवळसर पांढरे आडवे पट्टे असतात. फण्यावरील खूण आणि फण्याच्या आकारावरून नागराज सहज ओळखता येतो. याचा फणा नागांपेक्षा छोटा असतो डिवचला गेला असता 3 ते 4 फूट उंच फणा उभारतो. त्याच्या मानेवरील ^ आकाराची खूण इतर नागाच्या फण्यावर नसते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात