आपल्या बोटात कधी तीव्र वेदना होतात, कधी बोटाला फोड येतो, कधी बोटात काटा किंवा तसंच काही बारीक गोष्ट अडकते, ज्यामुळे त्रास होतो.
एका व्यक्तीच्या बाबतीतही असंच घडलं. त्याच्या हाताच्या एका बोटात तीव्र वेदना झाल्या, ते बोट सूजलं पण त्यामागील कारण मात्र धक्कादायक होतं.
कोली एनसिस नावाची ही व्यक्ती जिने आपल्या बोटांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत यामागील शॉकिंग कारण सांगितलं आहे.
कोलिस हा सर्पमित्र आहे आणि त्याच्या हाताच्या बोटात दुसरं तिसरं काही नाही तर एक सापाचा दात होता. त्याच्या बोटांच्या त्वचेत हा दात घुसला होता. (सर्व फोटो सौजन्य - ट्विटर)