JOIN US
मराठी बातम्या / Viral / नदीबाहेर असेलल्या मगरीवर सिंहाचा हल्ला; पुढे काय झालं पाहा VIDEO

नदीबाहेर असेलल्या मगरीवर सिंहाचा हल्ला; पुढे काय झालं पाहा VIDEO

हा व्हिडीओ क्रुगर सायटिंग्स नावाच्या युट्यूब चॅनलने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मगर नदीबाहेर दिसते आहे. तिच्यावर सिंहाची नजर पडते आणि तो तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 1 एप्रिल: जंगलात प्राण्यांना जगण्यासाठी, अन्नासाठी मोठा संघर्ष करायला लागतो. सिंहाला जंगलाचा राजा मानलं जातं, तसंच मगरही पाण्यातील धोकादायक जलचर आहे. सिंह, मगर काही सेकंदाच एखाद्यावर हल्ला करुन शिकार करतात. मगर पाण्यात तर अगदी सहज आपली शिकार शोधते, पण पाण्याबाहेरही प्राण्यांची शिकार करण्यात मगर तरबेज असते. सिंहानेदेखील मगरीची शिकार केल्याचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात मगर पाण्याबाहेर असताना सिंह तिच्यावर हल्ला करतो. हा व्हिडीओ क्रुगर सायटिंग्स नावाच्या युट्यूब चॅनलने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मगर नदीबाहेर दिसते आहे. तिच्यावर सिंहाची नजर पडते आणि तो तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. सिंहाच्या हल्ल्यानंतर मगर पुन्हा नदीकडे जाण्याचा प्रयत्न करते.

(वाचा -  भुकेल्या बिबट्यांसाठी मांस घेऊन पोहोचले तरुण; कळपानं बिबटे आले आणि… पाहा VIDEO )

सिंह मगरीजवळ इतक्या वेगात येतो, कि चारही बाजूला धूळ पसरते. त्याचवेळी दोन इतर सिंहही तेथे येतात. मगर स्वत:ला वाचवण्यासाठी प्रयत्न करते परंतु, सिंह मगरीला आपल्या जबड्यात पकडतो आणि तिची शिकार करतो. त्यानंतर इतर सिंहही त्या मगरीला खाण्याचा प्रयत्न करतात. परंतु सिंह आपली शिकार घेऊन, मगरीला जबड्यात धरुन तेथून पळ काढतो.

सोशल मीडियावर प्राण्यांचे, त्यांच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सिंह, मगर दे दोघेही सर्वाधित हिंस्त्र मानले जातात. इतर प्राणी अशा हिंस्त्र प्राण्यांपासून वाचण्यासाठी जंगलात राहताना मोठा संघर्ष करावा लागतो. हा व्हिडीओ सात वर्षांपूर्वी शेअर करण्यात आला होता आता तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या