फोटो - युट्युब व्हिडीओ ग्रॅब
मुंबई, 29 मे : आतापर्यंत तुम्ही बांगडी हातात घातली असेल पण कधी या बांगडीचा वापर तुम्ही तांदळात करून पाहिला आहे. तांदळात बांगडी टाकण्याचा मोठा फायदा आहे. तांदळात फक्त एक बांगडी टाका आणि अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. गृहिणींकडे काही ना काही घरगुती जुगाड असतात. अशाच एका गृहिणीने हा जुगाड दाखवला आहे. तिने आपल्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तिने तांदळात बांगडी टाकण्याचा फायदा दाखवला आहे. तांदळात बांगडी टाकल्याने काय होते, ते तिने या व्हिडीओत दाखवलं आहे.
महिलेने सांगितल्यानुसार एका भांड्यात तांदूळ घेऊन त्यात पाणी टाका. यात एक बांगडी टाका. दुसरं भांडं घ्या. त्यानंतर तांदळाचं भांडं हलवून घ्या. Kitchen Jugaad - फ्रिजमध्ये तेलाची कमाल; नक्की लावा, काय परिणाम होतो पाहा VIDEO बांगडी तांदळाच्या आत तळाशी जाईल. तांदूळ वर येतील. आता हातावर हळूहळू थोडे तांदूळ आणि पाणी दुसऱ्या भांड्यात गाळून घ्या. अशी प्रक्रिया हळूहळू शेवटपर्यंत करत राहा. आता शेवटी जे तांदूळ उरतील त्यात तुम्हाला दगड दिसतील. सर्व दगड भांड्याच्या तळाशी राहतात. बऱ्यादा तांदळात असे दगड असतात. त्यामुळे तांदूळ निवडावे लागतात. तरी एखाद दुसरा दगड तांदळात राहतो आणि मग भात खाताना तो तोंडात येतो. पण या पद्धतीने तांदळात एकही दगड राहणार नाही. शिवाय तांदळातील प्रत्येक दगड काढणं सोपं होईल. जिथं तांदूळ निवडून दगड काढायला वेळ जातो, तिथं या ट्रिकने काही वेळातच तांदळातील दगड काढता येतील. Kitchen Jugaad - कढईऐवजी तव्यावर एकाच वेळी बनवा भरपूर पुऱ्या; आठवडाभर गरमागरम खाल, पाहा Recipe Video युट्यूटब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही.
महिलेने सांगितल्यानुसार तांदूळ निवडण्याची ही ट्रिक खूप जुनी आहे. तुम्हीही ही ट्रिक वापरत होता का? नाहीतर एकदा करून पाहा आणि त्याचा परिणाम कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.